aamir khan 
मनोरंजन

अखेर आमीरने सांगितलं सोशल मीडिया सोडण्यामागचं कारण

स्वाती वेमूल

आपलं प्रत्येक काम, प्रत्येक प्रोजेक्ट आणि प्रत्येक चित्रपट परफेक्शनने करणारा अभिनेता म्हणून आमीर खान ओळखला जातो. त्याची कामाची पद्धत ही सर्वांपेक्षा वेगळी आहे आणि त्याला प्रत्येक गोष्ट त्याच्याच हिशोबाने परफेक्ट हवी असते. म्हणूनच त्याला बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' असं नाव देण्यात आलं आहे. यासाठी तो बरीच मेहनत घेत असतो आणि ही मेहनत घेताना त्याला कोणत्याच गोष्टीचा अडथळा नको असतो. आपल्या कामावर व्यवस्थित लक्ष केंद्रीत करता यावं यासाठी त्याने नुकताच सोशल मीडिया सोडण्याचा मोठा निर्णय घेतला. ज्या काळात सोशल मीडिया हा सेलिब्रिटी आणि चाहत्यांसाठी सर्वस्व झाला आहे, त्याचवेळी आमीरने त्याच्यापासून दूर जाण्याचा निर्णय काही साधासुधा नाही. यावर अनेकांची मतमतांतरे पाहायला मिळाली. काहींनी त्याच्या या निर्णयाचं स्वागत केलं तर काहींनी नाराजी व्यक्त केली. आता त्याने यामागचं नेमकं कारण काय होतं, हे सांगितलं आहे. 

"मला माझ्याच विश्वात राहायला फार आवडतं. त्यामुळे मी आधीपण सोशल मीडियावर फार सक्रिय नव्हतो. कधीतरी एखादी पोस्ट मी लिहायचो किंवा एखादा फोटो शेअर करायचो. मी माझ्या चाहत्यांच्या आणि प्रेक्षकांच्या संपर्कात आधीसारखाच राहीन. प्रसारमाध्यमांद्वारे मी त्यांच्याशी संवाद साधेन. त्यामुळे माझ्या सोशल मीडिया सोडण्याच्या निर्णयामागे काही विशेष कारण आहे असं समजू नका किंवा त्यावरून काही अफवा पसरवू नका", अशी विनंती त्याने केली. 

आमिरने नुकताच त्याचा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. आपल्या शेवटच्या पोस्टमध्ये त्याने लिहिलं, 'माझ्या वाढदिवसानिमित्त तुमच्याकडून मला भरभरून शुभेच्छा मिळाल्या. यासाठी तुम्हा सर्वांचे आभार. आता दुसरी गोष्ट अशी की, ही माझी सोशल मीडियावर शेवटची पोस्ट आहे. खरंतर सोशल मीडियावर मी फार अॅक्टिव्ह नव्हतोच. त्यामुळे मी त्यापासून लांब जाण्याचा विचार केला आहे. मात्र यामुळे आपल्या नात्यात काही फरक पडणार नाही.' आमिर खान आता स्वत:चं प्रॉडक्शन हाऊस सुरू करत असून त्याच्या माध्यमातून आगामी प्रोजेक्ट्सची माहिती चाहत्यांना देणार असल्याचं त्याने स्पष्ट केलं. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT