Aamir Khan esakal
मनोरंजन

Aamir Khan: हातात धगधगती मशाल अन् वाढलेले केस; आमिर खानच्या खतरनाक लूकची सर्वत्र चर्चा

Aamir Khan: खतरनाक लूकमधील आमिर खानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आमिरच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

priyanka kulkarni

Aamir Khan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खान (Aamir Khan) हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत असतो. आमिरच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. आमिरचा 2022 मध्ये लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर यश मिळालं नाही. बॉयकॉट ट्रेंडमुळे आमिरचा लाल सिंह चड्ढा हा फ्लॉप झाला. त्यानंतर आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊसचा 'लापता लेडीज' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाला देखील प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही. आता प्रेक्षक आमिरच्या आगामी चित्रपटांची वाट बघत आहेत. अशताच आता खतरनाक लूकमधील आमिर खानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आमिरच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

आमिर खान हा 16 वर्षानंतर अभिनेता दर्शील सफारीसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.आता दर्शीलनं सोशल मीडियावर आमिरचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आमिर खतरनाक लूकमध्ये दिसत आहे. दर्शीलनं शेअर केलेल्या फोटोमध्ये आमिर हा हातात धगधगती मशाल घेऊन उभा राहिलेला दिसत आहे. आमिरच्या फोटोला दर्शीलनं कॅप्शन दिलं, "हे आमिर खानचे मल्टीयूनिवर्स आहे. आम्ही सर्व त्यात जगत आहोत. अजून 3 दिवस बाकी..."

आमिरचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तो वाढलेले केस आणि हातात दगड अशा लूकमध्ये दिसत आहे.

दर्शील सफारीने काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर केली होती ज्यामध्ये त्याने 'तारे जमीन पर' चित्रपटातील फोटो आणि सध्याच्या प्रोजेक्ट्सचा फोटो शेअर केला होता. या फोटोला दर्शीलनं कॅप्शन दिलं, 'बूम.... 16 वर्षांनंतर आम्ही पुन्हा एकत्र आहोत, भावनिक वाटत आहे? हो, थोडेसे. लवकरच एक मोठी गोष्ट रिव्हिल होणार आहे"

आमिर खाननं एका मुलाखतीमध्ये त्याच्या आगामी चित्रपटाची माहिती चाहत्यांना दिली होती. तो म्हणाला होता, "मी याबद्दल कधी जाहीरपणे बोललो नाही. आताही मी जास्त बोलू शकणार नाही. पण चित्रपटाचे फक्त टायटल सांगतो. सितारे जमीन पर असे या चित्रपटाचे नाव आहे. तुम्हाला माझा 'तारे जमीन पर' हा चित्रपट आठवला असेल आणि या चित्रपटाचे नाव सितारे जमीन पर आहे कारण त्याच थीमवर हा चित्रपट आहे. तारे जमीन पर हा भावनिक चित्रपट होता. हा चित्रपट तुम्हाला हसायला लावेल. हा चित्रपट तुम्हाला रडवले, हा चित्रपट तुमचे मनोरंजन करेल."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्लीतील आंदोलनासह दिवसभरातील सर्व घडामोडींचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Panshet Flood Affected : पुण्यातील ६० हजार विस्थापित नागरिकांच्या जमिनीचा प्रश्न अखेर सुटला; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार

CJP Protest: राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेला जे.पी. नड्डांचं उत्तर; काँग्रेस सत्तेत असलेल्या राज्यातील पेपरफुटीचा वाचला पाढा

IND vs ZIM: 'आयर्लंडने डोळे उघडले' झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेपूर्वी कॅप्टन श्रेयस अय्यरचे मोठे वक्तव्य; म्हणाला, युवा खेळाडूंनी...

Stray Dog Attack : सहा महिन्याच्या झोपलेल्या मुलावर भटक्या कुत्र्याचा हल्ला; मुलगा गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT