Aamir Khan Google
मनोरंजन

थिएटरआधी आमिरचा 'लाल सिंग चड्ढा' पोहोचला रेडिओवर; 'कहाणी' लीक की रीलिज?

आमिर खानचा 'लाल सिंग चड्ढा' सिनेमा थिएटरमध्ये ११ ऑगस्ट,२०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

प्रणाली मोरे

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खानचा(Aamir Khan) बहुचर्चित सिनेमा 'लाल सिंग चड्ढा'(Lal Singh Chaddha) लवकरच आपल्या भेटीस येत आहे. आमिर खूप दिवसांनी मोठ्या पडद्यावर आपल्याला पाहता येणार असल्यानं चाहते भलतेच उत्साहात आहेत. आता आमिरनं या सिनेमाच्या प्रमोशनला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून आमिर काही व्हिडीओ शेअर करताना दिसला. त्या व्हिडीओत तो सांगत होता,''मी कहाणी सांगायला येतोय,पण नेमकं काय सांगतोय यामुळे सर्वांनाच प्रश्न पडला होता. कुणाला वाटलं,तो नव्या सिनेमाची घोषणा करतोय तर कुणाला वाटलं,तो एखादा नव्या उपक्रमाविषयी सांगणार आहे,पण कुणी कल्पना केली नव्हती की हा पठ्ठ्या त्याच्या लवकरच प्रदर्शित होणाऱ्या 'लाल सिंग चड्ढा'ची 'कहाणी' सांगेल म्हणून. पण आमिरनं चक्क रेडिओहून लाल सिंग चड्ढाची कहाणीच आता सांगून टाकली आहे. मात्र त्यामुळे भलतीच चर्चा रंगली आहे. काय घडलं नेमकं? चला जाणून घेऊया.

आमिरच्या 'त्या' कहाणी ड्रामावरुन पडदा उठला आहे. आणि लाल सिंग चड्ढाशी संबंधितच ती कहाणी असल्याचं आता समोर आलं आहे. आता सगळ्यांनाच उत्सुकता आहे,आमिरच्या लाल सिंग चड्ढाची नेमकी कहाणी काय याविषयी जाणून घेण्याची. तर ही कहाणी म्हणजे आमिरच्या लाल सिंग चड्ढातील सिनेमातलं पहिलं गाणं थेट रेडिओवरुन रिलीज करण्यात आलं आहे. आजकाल अनेकदा एखादं सिनेमाचं गाणं किंवा ट्रेलर,टीझर रीलिज करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो. पण आमिरनं मात्र पूर्वीचं सर्वात प्रमोशनचं हिट माध्यम असलेल्या रेडिओला प्राधान्य दिल्याचं दिसत आहे. 'कहानी' गाण्याला प्रीतमनं संगीत दिलं आहे. आणि अमिताभ भट्टाचार्यने या गाण्याला लिहिलं आहे. या गाण्याला आवाज मोहन खन्नानं दिला आहे. इमोशन्सनी भारलेलं हे गाणं प्रत्येक दर्दी रसिकाच्या मनाला स्पर्श करेल असं बोललं जात आहे. आताच्या सोशल मीडियाच्या काळात गाणं व्हिज्युअल शिवाय रिलीज करताना आमिर म्हणाला आहे की,''या गाण्यात त्याला आणि करिनाला पाहण्यापेक्षा ते ऐकणं अधिक आनंद देणारं ठरेल''.

आमिरनं ९३.५ एफएम या रेडिओ वाहिनीवर गाण्याला रिलीज करताना म्हटलं आहे की,''मला खात्री आहे की लाल सिंग चड्ढा सिनेमातील गाणी सिनेमाचा आत्ना आहेत आणि हा अल्बम माझ्या करिअरमधील सगळ्यांत बेस्ट गाण्यांचा संच ठरेल. प्रितम,अमिताभ,आणि गायक,टेक्नीशियन्सना चर्चेत ठेवण्यासाठी हे पाऊल उचलणं हा मी खुप विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहे. कारण रेडिओ हे एक चांगलं दर्जेदार माध्यम आहे संगीताला लोकांपर्यंत योग्य पद्धतीनं पोहोचवण्यासाठी''. आमिर खान पुढे म्हणाला,''मी या गाण्यावर लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे. आमच्या टीमनं यावर खूप मेहनत घेतली आहे''. सोशल मीडियावरही आमिरचं हे गाणं आता जोरदार व्हायरल झालं आहे. नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचाही पाऊस पडताना दिसत आहे.

आमिरचा 'लाल सिंग चड्ढा' सिनेमा हा ऑस्कर पटकावलेल्या हॉलीवूडच्या 'फॉरेस्ट गम्प' या सिनेमाचा हिंदी रीमेक आहे. या सिनेमाच्या माध्यमातून आमिर जवळ-जवळ अडीच वर्षांनी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. आमिर खान याआधी 'ठग्ज ऑफ हिंदुस्थान' सिनेमात दिसला होता. २०१८ मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. आमिरनं या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदा अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. या सिनेमात कतरिना कैफ आणि फातिमा सना शेखही महत्त्वाच्या भूमिकेत होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: अखेर ठरलं! मनोज जरांगेंची तोफ आझाद मैदानावर धडकणार,'या' अटींवर पोलिसांनी दिली परवानगी, जाणून घ्या कोणत्या?

Nashik News : नाशिकमध्ये 'ब्लॅक स्पॉट' नाहीसे होणार; महापालिकेकडून सुशोभीकरणाचा उपक्रम

Nashik News : गणेशोत्सवात फुलांचे दर कडाडले; संततधार पावसामुळे आवक घटली

Nashik Ganeshotsav : नाशिकमधील ३१ मंडळांकडून मौल्यवान गणपतीची स्थापना; सुरक्षेसाठी कडेकोट नियोजन

Rajnath Singh: संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांचा इशारा: भारतीय नौदल फक्त समुद्राचे नाही तर देशाच्या आर्थिक सुरक्षेचे मुख्य आधार आहे

SCROLL FOR NEXT