Aamir Khan Movie-‘Boycott Laal Singh Chaddha’ trends as trolls  Google
मनोरंजन

आमिरच्या 'लाल सिंग चड्ढा' सिनेमाच्या ट्रेलरला पाहून लोक नाराज, काय खटकले?

'लाल सिंग चड्ढा'च्या ट्रेलरला 'IPL 2022' च्या फिनाले दरम्यान रिलीज करण्यात आलं.

प्रणाली मोरे

बॉलीवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान(Aamir Khan) आणि करिना कपूरचा(Kareena Kapoor) सिनेमा 'लाल सिंग चड्ढा'(Lal Singh chaddha) या बहुप्रतिक्षित सिनेमाचा ट्रेलर अखेर समोर आला आहे. सिनेमाच्या ट्रेलरला आयपीएल २०२२ च्या फिनाले दरम्यान रिलीज करण्यात आलं. आमिर खानने सिनेमाच्या ट्रेलरला नॅशन टेलिव्हिजनवर लॉन्च करण्याचा नवा प्रयोग केल्यानं त्याची चर्चा मात्र नक्कीच रंगली. 'लाल सिंग चड्ढा'चा ट्रेलर समोर येताच आमिर खानचे चाहते मात्र भलतेच खूश झालेयत. प्रत्येकाला हा ट्रेलर पाहण्याची उत्सुकता होती. पण आता या ट्रेलरवर खूप प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. जिथे काही लोकांना हा ट्रेलर आवडला आहे तर दुसरीकडे मात्र काही जणं यातील चुका काढताना दिसत आहेत.

आमिर खानचा सिनेमा लाल सिंग चड्ढाचा ट्रेलर पाहिल्यानंतर काही लोक याला ब्लॉकबस्टर देखील म्हणाताना दिसत आहेत. एका नेटकऱ्यानं ट्वीट केलं आहे की, हा सिनेमा करोडो रुपये कमावणार आहे. एका दुसऱ्या नेटकऱ्यानं ट्वीट केलंय की,लाल सिंग चड्ढा सुपर-डुपर हिट होणार. झकास आहे ट्रेलर. पण काही नेटकरी मात्र सिनेमातील चुका काढताना देखील दिसत आहेत. एकानं लिहिलंय,ट्रेलर भावनाशून्य वाटला...

आमिर खानचा सिनेमा 'लाल सिंग चड्ढा'चा ट्रेलर पाहिल्यानंतर काही लोक याला ब्लॉकबस्टर देखील म्हणताना दिसत आहेत. एका नेटकऱ्यानं ट्वीट केलं आहे की, 'हा सिनेमा करोडो रुपये कमावणार आहे'. एका दुसऱ्या नेटकऱ्यानं ट्वीट केलंय की,'लाल सिंग चड्ढा सुपर-डुपर हिट होणार. झकास आहे ट्रेलर'. पण काही नेटकरी मात्र सिनेमातील चुका काढताना देखील दिसत आहेत. एकानं लिहिलंय,'ट्रेलर भावनाशून्य वाटला..' . टॉम हॅंक्सची नक्कल करण्यावरुन नेटकऱ्यांनी आमिरला चांगलंच ट्रोल केलं आहे. रीमेकच्या अनेक चुका काढताना लोक दिसत आहेत. तर एकानं लिहिलंय,'फॉरेस्ट गंप नही,फॉरेस्ट डंप आहे हा सिनेमा'. 'फॉरेस्ट गम्प आतापर्यंतच्या चांगल्या सिनेमांपैकी एक आहे,पण आमिरचा लाल सिंग चड्ढा मात्र बकवास सिनेमा आहे'. 'याच्यातील एकही सीन बघण्या लायक वाटला नाही'. कुणी म्हटलंय,'आमिरचा हा सिनेमा 'पीके' आणि 'धूम ३' चं कॉम्बिनेशन वाटत आहे'.

'लाल सिंग चड्ढा' या सिनेमाचं दिग्दर्शन अद्वैत चंदननं केलं आहे. 'लाल सिंग चड्ढा' १९९४ मध्ये आलेल्या 'फॉरेस्ट गम्प' या हॉलीवूड सिनेमाचा रीमेक आहे. 'लाल सिंग चड्ढा' मध्ये आमिर आणि करिना व्यतिरिक्त मोना सिंग,नागा चैतन्य महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. आमिर खानचा हा सिनेमा ११ ऑगस्ट २०२२ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. सिनेमातील 'कहानी' आणि 'मै की करां' ही गाणी ट्रेलर आधी रिलीज करुन आमिरनं सिनेमाची चांगलीच वातावरण निर्मिती केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women T20 World Cup: T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये टीम INDIA ची एन्ट्री पक्की? फक्त 'या' ३ गोष्टी आणि इतिहास घडणार!

NEET-UG पुनर्परीक्षेआधीच टोकाचं पाऊल; १७ वर्षीय विद्यार्थ्यानं सहाव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं

क्रीडा विश्वातील 'शू सायन्स': खेळाडूंच्या बुटांचे तळवे प्रत्येक खेळानुसार का बदलतात ? जाणून घ्या त्यामागचं विज्ञान!

Viral Video: ''सगळ्यांना पप्पा आहेत.. मम्मी म्हणत होती दारु पिऊ नका, पण तुम्ही ऐकलं नाही'', वडिलांच्या फोटोसमोर चिमुकलीची नाराजी

Latest Marathi News Live Update: ब्रम्हगाव प्रकरणातील मागण्या मान्य; भिमाशंकर यादव यांचे उपोषण स्थगित

SCROLL FOR NEXT