Aamir Khan Movie Laal Singh Chaddha connection with oscar, Read Google
मनोरंजन

बॉक्स ऑफिसवर डळमळणाऱ्या लाल सिंग चड्ढाचं नाव जोडलं जातंय ऑस्करशी,जाणून घ्या

आमिर खानचा लाल सिंग चड्ढा सध्या वादांमुळे भरपूर चर्चेत असताना,ऑस्कर अकादमीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर सिनेमासंदर्भात मोठी बातमी पोस्ट केली गेलीय.

प्रणाली मोरे

Laal Singh Chaddha: बॉलीवूड सुपरस्टार आमिर खानचा(Aamir Khan) सिनेमा लाल सिंग चड्ढा भलताच वादात सापडला आहे. हॉलीवूड सिनेमा फॉरेस्ट गम्पच्या या हिंदी व्हर्जनला भले मोठ्या संख्येनं लोकांचा विरोध असला तरी ऑस्करच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर या सिनेमाला पाठिंबा दर्शवण्यात आला आहे. आता आमिर खानला नक्कीच प्रतिक्षा असेल ते आपल्या लाल सिंग चड्ढावर सुपरस्टार टॉम हॅंक्स काय प्रतिक्रिया देतोय.(Aamir Khan Movie Laal Singh Chaddha connection with oscar, Read)

ऑस्कर अकादमीच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ क्लीप शेअर करण्यात आली आहे,ज्यात ओरिजनल फॉरेस्ट गम्प आणि हिंदी व्हर्जन लाल सिंग चड्ढा मधील एक सीन दाखवण्यात आला आहे. या व्हिडीओला शेअर करत लिहिलं गेलं आहे की, ''रॉबर्ट जेमेकिस आणि रोथनं लिहिलेली कथा ज्यामध्ये एक माणूस आपल्या उदारमतवादी स्वभावानं जग जिंकतो,याचं अद्वैत चंदन आणि अतुल कुलकर्णी यांनी भारतीय रुपांतरण करताना लाल सिंग चड्ढा लिहिला. सिनेमात मुख्य भूमिकेत आमिर खान आहे,जी भूमिका हॉलीवूड स्टार टॉम हॅंक्सने फॉरेस्ट गम्पमध्ये साकारली होती,अन् प्रसिद्ध केली होती''.

या पोस्टमध्ये फॉरेस्ट गम्पने ऑस्कर पुरस्कार जिंकले आहेत याविषयी देखील माहिती दिली आहे. १९९४ मध्ये या सिनेमाला वेगवेगळ्या १३ विभागात नामांकनं मिळाली होती. त्यानंतर उत्कृष्ट अभिनेता, उत्कृष्ट दिग्दर्शक, उत्कृष्ट संकलन, व्हिज्यु्अल इफेक्ट्स,अडॅप्टेड स्क्रीनप्ले, उत्कृष्ट सिनेमा यासाठी ६ ऑस्कर पुरस्कार मिळाले होते. याव्यतिरिक्त फॉरेस्ट गम्प सिनेमाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर लाल सिंग चड्ढाच्या ट्रेलर व्यतिरिक्त काही व्हिडीओ आणि फोटो शेअर केले गेले आहेत.

माहितीसाठी इथं सांगतो की, आमिर खानने पत्र लिहून टॉम हॅंक्सला सिनेमा पहायची विनंती केली आहे. याला उत्तर देताना टॉम हॅंक्सच्या टीमनं कळवलं आहे की वेळ मिळेल तेव्हा याविषयी ते निर्णय घेऊन सिनेमा केव्हा पहायचा ते ठरवतील. याआधी आमिर आणि टॉमची भेट एका कार्यक्रमा दरम्यान दिग्दर्शक स्टीवन स्पीलबर्गने घडवून आणली होती. तेव्हा स्टीवनने आमिरला भारताचा जेम्स कॅमरुन म्हणून संबोधलं होतं. टॉम हॅंक्सने देखील हे कबूल केलं आहे की त्यानं आमिरचा थ्री इडियट सिनेमा कितीतरी वेळा पाहिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Protest: सोशल मीडियावरील बंदीवरून नेपाळ ढवळून निघाला; भारताने नागरिकांना सतर्कतेचा सल्ला दिला, सांगितलं...

महाराष्ट्राच्या Shivam Lohakare ने मोडला 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राचा विक्रम; पण, होणार नाही अधिकृत नोंद, कारण...

Pune News : विसर्जन मिरवणुकीत हायटेक पोलिसिंग; चेहरा ओळख तंत्रज्ञानाचा अचूक वापर; सराईत गुन्हेगारांवर चाप

Shivaji Maharaj: इतिहासातील गुपित! छत्रपती शिवाजी महाराजांनी बोटं छाटल्यानंतर शाहिस्तेखान कुठं पळाला? पुढं कधीच परतला नाही

Thane Crime: सोनसाखळी चोरणारी आंतरराज्य टोळी गजाआड, तीन सराईत गुंडांना अटक

SCROLL FOR NEXT