aamir khan latest news esakal
मनोरंजन

Aamir Khan In Pune : आमिर खान पुणे विमानतळावर झाला 'स्पॉट'! 'लापता लेडीज'शी आहे खास कनेक्शन?

आमिर खानच्या लापता लेडीजच्या (Aamir Khan Laapataa Ladies movie) नावाच्या चित्रपटानं आता वेगळा माहोल तयार झाला आहे. त्याच्या प्रमोशनची चर्चा सुरु आहे.

युगंधर ताजणे

Aamir Khan New Viral Video : बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ज्याची ओळख आहे त्या आमिर खानच्या एका नव्या (Aamir Khan Viral News) चित्रपटाची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. किरण राव दिग्दर्शित लापता लेडीजविषयी चाहत्यांना मोठी उत्सुकता आहे. यातच आता आमिर खान पुण्यात आल्याच्या चर्चांना उधाण आले आणि चाहत्यांच्या उत्साहाला उधाण आल्याचे दिसून आले.

किरण राव यांच्या लापता लेडिजविषयी बोलायचे झाल्यास यापूर्वी (Laapataa Ladies latest news) जगभरातील वेगवेगळ्या महोत्सवांमध्ये या चित्रपटाचे स्क्रिनिंग पार पडले आहे. पुण्यात देखील त्याचे विशेष स्क्रिनिंग होणार असल्याची माहिती आहे. या (aamir Khan in pune) बरोबरच आमिर खान आणि किरण राव यावेळी माध्यमांशी संवाद साधणार असल्याचे बोलले जाते. लापता लेडिजच्या प्रमोशनच्या निमित्तानं हे सेलिब्रेटी चाहत्यांशी देखील गप्पा मारणार आहेत.

निर्माता म्हणून आमिर खान सध्या त्याचा पुढचा चित्रपट लपता लेडीजच्या रिलीजच्या तयारीत आहे. हा चित्रपट त्यांची माजी पत्नी किरण राव यांनी दिग्दर्शित केला आहे जो 1 मार्च रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. सध्या चित्रपटाची टीम देशभरात या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. दरम्यान, 'मोस्टली मिसिंग' सुपरस्टार आमिर खान पुणे विमानतळावर स्पॉट झाला आहे.

लापता लेडीज या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पुण्याला जाणाऱ्या या सुपरस्टारने आपल्या उपस्थितीने सर्वांनाच चकित केले आहे. वास्तविक, सर्वांना माहित आहे की आमिर खान सार्वजनिक ठिकाणी क्वचितच दिसतो, जेव्हा तो अलीकडे दिसला तेव्हा चाहत्यांसाठी तो धक्का आश्चर्याचा धक्का होता. या दरम्यान आमिर खान 'मोस्टली लापता' टी-शर्ट घातलेला दिसला.

आमिर खान सध्या त्याच्या आगामी 'सितारे जमीन पर'चे शूटिंग करत आहे आणि त्याचवेळी तो 'लाहोर 1947' च्या प्रोडक्शनवरी त्याचे काम सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chh. Sambhajinagar Crime: नशेच्या बाजारात खोकला! परराज्यातून धुळ्यात अन् तेथून शहरात यायचे कफ सिरप; तब्बल १८ हजार ३६० बॉटल जप्त

Gokul Dairy protest : कोल्हापुरात 'गोकुळ' चे वातावरण तापलं; मोर्चेकरी अन् पोलिसांत झटापट, जनावरे थेट कार्यालयात घुसवण्याचा प्रयत्न

Diwali Gift : दिवाळीला सोनपापडी देणाऱ्यांनो! गिफ्ट अन् बोनस कसा द्यायचा असतो यांच्याकडून शिका! कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलं मोठं सरप्राइज

Latest Marathi News Live Update : : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सेंटर ऑफ एक्सलन्सची पाहणी केली

Vasubaras 2025 Rangoli Designs: वसुबारसच्या दिवशी अंगणात काढा सुंदर अन् आकर्षक रांगोळी, पाहा 'या' सोप्या डिझाईन्स

SCROLL FOR NEXT