Amir Khan speaks on 'The Kashmir Files' Google
मनोरंजन

The Kashmir Files :आमिर म्हणतो,'अजून पाहिला नाही पण... '

'RRR' सिनेमाच्या प्रमोशन निमित्तानं आयोजित एका कार्यक्रमात आमिर खाननं The Kashmir Files सिनेमाविषयी आपले मत मांडले.

प्रणाली मोरे

संपूर्ण भारतभरात विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द काश्मिर फाईल्स'(The Kashmir Files) सिनेमाची भलतीच चर्चा आहे. प्रदर्शनाआधी सिनेमा अनेक वादांमुळ चर्चेत आला तर प्रदर्शननानंतर आता सिनेमातील सत्य घटनेला पडद्यावर अनुभवणारा प्रत्येक जण भावूक होताना दिसतोय,त्यावर व्यक्त होताना दिसतोय. सर्वसामान्यांपासून राजकीय नेत्यांपर्यंत सारेच या सिनेमावर कधी समर्थनार्थ तर कधी विरोधी विचारांतून व्यक्त होताना दिसत आहेत. बॉलीवूडमधील अनेक बोलणाऱ्या मंडळींनी या सिनेमावर व्यक्त होण्याऐवजी मौन बाळगणं पसंत केलं आहे. पण अखेर बॉलीवूडचा परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खाननं(Amir Khan) या सिनेमावर आपलं मौन सोडलं.

एस.एस .राजामौली यांच्या'RRR' सिनेमाच्या प्रमोशन निमित्तानं एका कार्यक्रमात आमिर आला होता. त्यावेळी त्याला द काश्मिर फाईल्स सिनेमा पाहिलास का असा प्रश्न विचारला गेला होता. त्यावर आमिर म्हणाला,''मी पाहिला नाही पण नक्कीच हा सिनेमा पाहणार आहे. भारताच्या इतिहासातल्या त्या कटू सत्याला सिनेमाच्या माध्यमातून अनुभवून आज लोकांमध्ये चीड आहे,अनेकांचं मन दुखावलं आहे तो सिनेमा मी नक्की पहाणार. जे काश्मिरमध्ये घडलं,काश्मिरी पंडितांसोबत झालं त्यावर विश्वास ठेवणं नक्कीच दुःखदायक आहे. हा सिनेमा प्रत्येक हिंदुस्थानीला पाहायला हवा. ज्यांचा माणुसकीवर आजही विश्वास आहे त्या प्रत्येक माणसाच्या मनाला हा सिनेमा स्पर्श करेल. आणि हे सर्वात महत्त्वाचं आहे. मला आनंद होतोय की या सिनेमाला लोकं पसंत करीत आहेत'.

'द काश्मिर फाईल्स' सिनेमानं १०० करोडच्या क्ल्ब मध्ये एन्ट्री केलेली आहे. अजूनही सिनेमागृहात सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकवर्ग गर्दी करताना दिसत आहेत. या सिनेमात अनुपम खेर,पल्लवी जोशी,चिन्मय मांडलेकर,मिथुन चक्रवर्ती अशा कलाकारांनी काम केलं आहे. सिनेमा ११ मार्च रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Harbour Line: मुंबईकरांचा खोळंबा! हार्बर लाईनवरील Up-Down दोन्ही मार्ग बंद; हजारो प्रवासी स्टेशनवर अडकले

Pune Railway Station: पुणे स्थानकावर रविवारी ‘मेगाब्लॉक’; पुणे-दौंड लोहमार्गावरील कामासाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय

Jalgaon MPSC Exam : जळगावात MPSC परीक्षेसाठी कडक सुरक्षा, लागू झाली 'ही' नियमावली; कॉपीमुक्त अभियानासाठी प्रशासन ॲक्शन मोडमध्ये!

Shocking : भारतीय क्रीडाविश्वात शोककळा... आशियाई सुवर्णपदक विजेत्या जसपाल राणा यांचे निधन, घडवलेत मनू भाकरसह अनेक खेळाडू

Latest Marathi News Live Update : हार्बर लाईनवरील रेल्वे वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT