aamir khan 
मनोरंजन

जेव्हा आमिर खान घरी येऊन रडायचा, सिनेमे हातात असुनही संपत होतं करिअर

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- मिस्टर परफेक्शनिस्टच्या नावावर बॉलीवूडचा आमिर खान आज भारतातील टॉपच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. करिअरमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारत त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. आमिरने एक नाही, दोन नाही तर कित्येक अशा सिनेमांमधून त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आणि लोकांना आश्चर्यचकित केलं. 'कयामत से कयामत तक', 'दिल', 'तारे जमीन पर', '३ इडियट्स', 'दंगल' आणि 'पीके' सारखे जबरदस्त सिनेमे करुन त्यांने अनेकदा स्वतःला वेगळं सिद्ध केलं. नुकताच आमिर खान बेनेट युनिवर्सिटीच्या 'पदवीदान सभारंभ २०२०' मध्ये पोहोचला होता. आमिर या कार्यक्रमाचा मुख्या पाहुणा होता. या कार्यक्रमात त्याने विद्यार्थ्यांसोबतअनेक गोष्टी शेअर केल्या. सोबतंच त्याने त्याच्या करिअरची तुलना भांड्यात अडकल्यासारखी केली. 

आमिर खानने सांगितलं 'कयामत से कयामत तक'नंतर मी जवळपास कथेच्या आधारावर आठ, नऊ सिनेमे साईन केले. त्यावेळी दिग्दर्शक देखील नवीनंच होते. या सिनेमांनी बॉम्बफेक सुरु केली आणि मग मला मिडियाद्वारे 'वन फिल्म वंडर' म्हटलं गेलं मात्र माझं करिअर बुडत चाललं होतं. असं वाटलं की मी खूप घाईत आहे. मी खुप दुःखी होतो आणि घरी येऊन रडायचो.' त्याने सांगितलं की तो ज्या लोकांसोबत काम करत होता ते कामासाठी उत्सुक नव्हते आणि त्याला जाणवायला लागलं की त्याने त्या काळात जे सिनेमे केले ते चांगले नव्हते.

आमिरने सांगितलं की 'कयामत से कयामत तक'च्या पहिल्या दोन वर्षांमध्ये मी आयुष्यातील सगळ्यात कमजोर अवस्थेचा अनुभव घेतला. जे सिनेमे मी साईन केले होते ते एकानंतर एक रिलीज होऊन फ्लॉप व्हायला लागले. मी विचार केला की आता मी संपलोय.     

aamir khan recalled a time when his career was sinking and he would come home and cry  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात धो-धो! पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे; पुणे-रायगडला 'रेड अलर्ट', मुंबईसह 26 जिल्ह्यांना हवामान खात्याचा मोठा इशारा

Police Transfer: पोलिसांत मोठा फेरबदल! १२५ डीएसपी अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; अनेक जिल्ह्यांना नवे अधिकारी, कुणी घेतला निर्णय?

Pune News: मोठी दुर्घटना टळली! कुसगाव खिंडीत दरड कोसळल्याने राजगड–हवेली मार्गावरील वाहतूक ठप्प; प्रशासनाने तातडीने हटवला अडथळा

Latest Marathi News Live Update : पुण्यात पावसाची संततधार; घाटमाथ्यावर पुढील तीन दिवस ‘रेड अलर्ट’

Pune Water Crisis: पुण्याची पाणीचिंता वाढली! खडकवासला धरणसाखळीतील साठा गतवर्षीपेक्षा पाचपट कमी; केवळ ७६ दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक

SCROLL FOR NEXT