Aamir Khan Latest News esakal
मनोरंजन

Aamir Khan : ख्रिसमसमध्ये आमिर खान करणार मोठा धमाका, त्याच्याच 'या' चित्रपटाचा सिक्वेल करणार प्रदर्शित?

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खाननं (Aamir Khan New movie) त्याच्या नव्या चित्रपटाच्या सिक्वेलच्या प्रदर्शनाविषयी खुलासा केला आहे.

युगंधर ताजणे

Aamir Khan New Movie : बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानसाठी गेलं वर्ष फारसं लाभदायी ठरलं नव्हतं. त्याच्या लाल सिंग (Aamir Khan Latest news) चढ्ढा नावाच्या चित्रपटाला प्रेक्षकांनी नाकारलं आणि आमिर खान भलताच नाराज झाला होता. प्रेक्षक आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात नाकारतील असे त्याला वाटले नव्हते.

आमिरनं हॉलीवूडचा प्रसिद्ध चित्रपट फॉरेस्ट गंप नावाच्या चित्रपटाचा हिंदी (Aamir Khan Latest Project) रिमेक केला होता. मुळच्या चित्रपटानं ऑस्करपर्यत मजल मारुन त्यातील काही पुरस्कार आपल्या नावावर केले होते.जगभरातील सिनेप्रेमींच्या आवडत्या चित्रपटांच्या यादीत टॉम हँक्सच्या फॉरेस्ट गंपचा समावेश केला जातो. अशावेळी आमिरच्या लाल सिंग चढ्ढाकडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या.

आमिर खान, करिना कपूर यांच्या महत्वाच्या भूमिका असलेल्या लाल सिंग चढ्ढाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांकडून नाकारलं गेलं. बॉक्स ऑफिसवर (Laal Singh Chaddha Movie) हा चित्रपट आपटला होता. यानंतर आता आमिर खानकडून त्याच्याच एका चित्रपटाच्या सिक्वेलची तयारी सुरु केल्याची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून आमिरच्या या प्रोजेक्टची चर्चा होत आहे.

येत्या ख्रिसमसमध्ये आमिर खान त्याच्या तारे जमीन पर नावाच्या चित्रपटाचा सिक्वेल सितारे जमीन पर म्हणून नवी कलाकृती समोर घेऊन येणार असल्याचे बोलले जात आहे. गेल्या वर्षीपासून आमिरच्या नव्या प्रोजेक्टविषयी चर्चा रंगली होती. तारे जमीन पर मधून आमिर खाननं डिसलेक्सिया नावाच्या आजाराविषयी भाष्य केलं होतं. २००७ मध्ये आलेल्या या चित्रपटानं चाहत्यांना जिंकून घेतलं होतं.

आमिरनं टीव्ही ९ च्या एका इव्हेंटमध्ये सितारे जमीन पर नावाचा चित्रपट येत्या ख्रिसमसला प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे. त्यानं या चित्रपटाच्या शुटींगला सुरुवातही केली आहे. या चित्रपटामध्ये आमिरच्या वाट्याला फारशी भूमिका नसून त्यामध्ये जेनेलिया ही प्रमुख अभिनेत्री म्हणून दिसणार असल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: श्रेयस अय्यरचे शतक, जिंकूनही पंजाब किंग्सची प्ले ऑफमधील जागा पक्की नाहीच... जाणून घ्या समीकरण

IPL 2026 KKR Playoff Scenario : कोलकाता नाइट रायडर्ससमोर अवघड गणित! पंजाबला नेट रन रेटमध्ये मागे टाकायचे असेल तर...

थायलंडला जाणं महागणार! भारतीयांसाठी Visa Free Entry रद्द; नवीन नियम लागू, आता प्रवेश कसा मिळणार?

Arjun Tendulkar: अर्जुनसोबत चुकीची वागणुक, त्यात रिषभ पंतने 'पारा' चढवला... सचिनचा मुलगा संतापला; नेमकं काय घडलं?

Monsoon Progress Update : मॉन्सूनची प्रगती हवामान विभागाचा दुजोरा, काही तासात केरळात दाखल; अरबी समुद्राचा भाग व्यापला

SCROLL FOR NEXT