Junaid Khan, Superman Actor Henry Cavill: Esakal
मनोरंजन

Junaid Khan: काय सांगता आमिरच्या लेकानं हॉलिवूड सिनेमा केलाय? नेटकरी असं का म्हणताय?

Junaid Khan, Superman Actor Henry Cavill: सध्या आमिरची लेक आयरा खान आणि नुपूरचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. मात्र आता आमिरच्या लेकीची नाही तर लेकाची चर्चा सुरु झाली आहे.

Vaishali Patil

Junaid Khan, Superman Actor Henry Cavill: आमिर खानची मुलगी आयरा खानने तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत बुधवारी कोर्ट मॅरेज केले आहे. आता पारंपरिक रितीरिवाजानुसार दोघांचे लग्न आणि रिसेप्शन होणार आहे. आमिर खानचा जावई फिटनेस ट्रेनर आहे.

लग्नाच्या दिवशी तो हाफ पँट आणि टि शर्टमध्ये लग्न मंडपात दिसला होता. सध्या आमिरची लेक आयरा खान आणि नुपूरचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. मात्र आता आमिरच्या लेकीची नाही तर लेकाची चर्चा सुरु झाली आहे. आमिरचा मुलगा जुनैद खान आता प्रसिद्धीच्या झोतात आला आहे.

जुनैद खानचे बरेच फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. आता नेटकऱ्यांनी त्याची तुलना थेट सुपरमॅन अभिनेता हेन्री कॅव्हिलसोबत केली आहे. तो हेन्री कॅव्हिलसारखा दिसत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

विरल भयानीने त्याच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात जुनैद खान आपल्या बहिणीच्या लग्नात सुट घातलेला दिसत आहे. यावेळी नेटकऱ्यांनी त्याला देसी सुपरमॅन म्हटले. इतकच नाही तर तो सुपरमॅन अभिनेता हेन्री कॅव्हिलसारखाच दिसतो असंही बऱ्याच लोकांनी म्हटलं. सध्या सोशल मिडियावर दोघांचे फोटो व्हायरल होत आहे. नेटकरी या फोटोंवर प्रतिक्रिया देत आहेत.

हेन्री कॅविल बद्दल बोलायचे झाले तर तो एक ब्रिटिश अभिनेता आहे. हेन्री हा त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जातो. सुपरमॅन चित्रपटामुळे त्याच्या लोकप्रियतेत खुपच वाढ झाली आहे.

तर दुसरीकडे काही काळापूर्वी जुनैद खानच्या बॉलिवूड डेब्यूच्या बातम्या चर्चेत आहे. साऊथची अभिनेत्री साई पल्लवी हिच्यासोबत तो अभिनय क्षेत्रात पदार्पण करू शकतो. अशी चर्चा आहे. तसेच आमिर खान लवकरच आपल्या मुलाच्या डेब्यू चित्रपटाची घोषणा करू शकतो अशी अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Tank Tower: मोठी घटना! नागपुरात पाण्याच्या टाकीचा टॉवर कोसळला; ३ जणांचा मृत्यू, अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले

SSC CGL Tier 1 Result 2025: SSC CGL टियर 1 परीक्षा 2025 चा निकाल जाहीर; पहा कुठे अन् कसा पाहायचा रिजल्ट

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर महापालिका निवडणूक : महायुतीचे खातेवाटप अजूनही गुलदस्त्यात

भारताची जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू स्पर्धेत खेळला; फोटो, व्हिडीओ व्हायरल होताच पाकड्यांचा संताप, खेळाडूवर कठोर कारवाई

Kolhapur Election : ‘विजयी होणाऱ्यालाच तिकीट!’ शिवसेना शिंदे गटाचा ठाम निर्णय; महापालिका निवडणुकीसाठी रणनिती ठरली

SCROLL FOR NEXT