aamir khan
aamir khan 
मनोरंजन

आमिर खानला कोरोना; दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांसोबत कार्यक्रमात होता हजर

स्वाती वेमूल

बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' अर्थात आमिर खानला कोरोनाची लागण झाली आहे. आमिर सध्या घरीच क्वारंटाइनमध्ये राहत असून सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करत असल्याची माहिती त्याच्या प्रवक्त्यांनी दिली. त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसांत आमिरच्या संपर्कात आलेल्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असंदेखील त्यांनी म्हटलंय. २२ मार्च रोजी जागतिक जल दिनाचं औचित्य साधून पाणी फाऊंडेशनच्या 'सत्यमेव जयते समृद्ध गाव' स्पर्धेच्या कार्यक्रमात आमिरने हजेरी लावली होती. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसुद्धा कार्यक्रमाला उपस्थित होते. 

आमिर सध्या त्याच्या आगामी 'लालसिंह चड्ढा' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. मात्र कोरोनाची लागण झाल्याने चित्रपटाचं शूटिंग थांबवण्यात आलं आहे. आमिर पूर्ण बरा झाल्यानंतर शूटिंगला पुन्हा सुरुवात होईल, अशी माहिती त्याच्या प्रवक्त्यांनी दिली. 

कोव्हिडचा संसर्ग झपाट्याने वाढत असून रुग्णदुपटीचा कालावधी १०० दिवसांच्या आत आला आहे. अवघ्या सात दिवसांच्या काळात मुंबईतील कोव्हिड रुग्णदुपटीचा कालावधी ५६ दिवसांनी घटला आहे. मुंबईत मंगळवारी दिवसभरात ३५१२ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे रुग्णांची संख्या ३ लाख ६९ हजार ४२६ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात आठ जणांचा मृत्यू झाला. मुंबईत ३८ इमारती आणि झोपडपट्ट्या प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. तर सक्रिय सीलबंध इमारतींची संख्या ३६३ इतकी आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : ''मी पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये नसलो तरी...'' अरविंद केजरीवाल थेटच बोलले

MS Dhoni CSK vs RR : चाहत्यांना विनंती आहे की सामन्यानंतर... राजस्थानच्या मॅचनंतर धोनी निवृत्ती घेणार?

Sunil Gavaskar IPL 2024 : आयपीएल सोडून देशाकडून खेळणाऱ्या खेळाडूंना शिक्षा करा! गावसकरांनी BCCI कडे केली मागणी

IPL 2024 CSK vs RR Live Score : चेन्नईने राजस्थानला दिले दोन धक्के;

Sanjay Raut Nashik Daura : प्रचाराला आले अन् प्रदर्शनात रमले संजय राऊत

SCROLL FOR NEXT