Ira Khan Wedding : Esakal
मनोरंजन

Ira Khan Wedding : आज आमिरच्या लेकीचं लग्न! Pre Wedding चे फोटो शेयर करत केला होणाऱ्या नवऱ्यावर प्रेमाचा वर्षाव

बॉलीवूड सुपरस्टार आमिर खानची मुलगी इरा खान आज तिचा प्रियकर नुपूर शिखरेसोबत लग्न करणार आहे.

Vaishali Patil

Ira Khan and Nupur Shikhare's wedding: सध्या सर्वत्र आमिर खानची लेक आयरा खानच्या लग्नाची चर्चा आहे. आमिर खान आणि रीना दत्ताची मुलगी आयरा तिचा प्रियकर नुपूर शिखरेसोबत लग्नगाठ बांधणार आहे.

3 जानेवारी म्हणजेच आज सर्व कुटुंबीयांच्या उपस्थितीत दोघेही मराठमोळ्या पद्धतीने लग्न करणार आहेत.

कालपासून आयरा आणि नुपूरच्या लग्नापुर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. सोशल मीडियावर बरेच व्हिडिओ समोर आला आहे. आमिरच्या दोन्ही पुर्व पत्नींचा मराठमोळा लूक देखील व्हायरल झाला होता.

सध्या आयरा आणि नुपूरच्या प्री-वेडिंग फंक्शनचे काही फोटो समोर आले आहेत. आमिरची लेक आयरा अन् नुपुरनं देखील काही फोटो सोशल मिडियावर शेयर केले आहेत.

या फोटोंमध्ये आयरानं गोल्डन ब्लाउजसह मरून साडी नेसली होती. तर नुपूर शिखरेने मरुन कुर्त्यावर गोल्डन ब्राऊन जॅकेट आणि डोक्यावर फेटा बांधला होता. दोघेही एकमेकांना घास भरवत होते. सध्या दोघांचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

तर ही पोस्ट शेयर करत नुपूर शिखरेने कॅप्शनमध्ये लिहिले, 'आयरा खान, आणखी एक दिवस तूझी नवरा होण्यासाठी. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो.'

सध्या आयरा अन् नुपूरच्या पोस्टवर नेटकरी कमेंट करत आहेत. अनेकांनी तिला लग्नासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर अनेकांनी जोडीचं कौतुक केलं आहे.

आयरा खानचा होणारा पती नुपूर शिखरे हा एक प्रसिद्ध फिटनेस ट्रेनर आहे. तो आमिर खानचा ट्रेनरही असून तो आयरालाही फिटनेस ट्रेनिंग देत होता. यादरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केल्याचे सांगितले जाते. नुपूर बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनचा देखील ट्रेनर आहे. आयरा आणि नुपूर या दोघीही एकमेकांच्या कुटुंबाच्या खूप जवळ आहेत. आता त्याच्या लग्नाची चाहत्यांना उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT