Ira Khan onReveals Her Wedding Date Aamir Khan's Daughter Ira Reveals Her Wedding Date Esakal
मनोरंजन

Ira Khan Reveals Her Wedding Date: ठरलं तर मग! आमिर खानची लेक 'या' दिवशी अडकणार लग्न बंधनात...

Vaishali Patil

Aamir Khan's Daughter Ira Reveals Her Wedding Date: बॉलिवूड अभिनेता आमिर खान हा बॉलीवूडचा परफेक्शनिस्ट आहे. मात्र तो जितका चर्चेत असतो तितकीच त्याची लाडकी लेक मुलगी  इरा खान ही देखील चर्चेत असते.

 इरा खान ही नेहमीच तिच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत येणारी सेलिब्रेटी आहे.  इरा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आयरा तिच्या वैयक्तिक आयुष्यातील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

 इरा नेहमी लाइम लाइटमध्ये राहायला आवडते. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर आमिरची लाडकी मुलगी  इराने 18 नोव्हेंबर रोजी तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत साखरपुडा केला.

यावेळी आमिरची पुर्ण फॅमिलीही त्या कार्यक्रमात आली होती. दोघांच्या साखरपुड्याचे फोटो देखील सोशल मिडियावर व्हायरल झाले होते.

 इरा आणि नुपूर च्या एंगेजमेंटनंतर दोघांचे चाहते त्याच्या लग्नाची वाट पाहत होते. तिच्या चाहत्यांनीही तिला बऱ्याचदा लग्नाबाबत प्रश्न विचारले होते. आता  इराने तिच्या लग्नाबाबत चाहत्यांना अपडेट दिली आहे.

26 वर्षीय  इराने ती कोणत्या तारखेला लग्न करणार आहे हे पहिलेच ठरवल्याचं ETimes ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. त्याच बरोबर या खास तारखेलाच ती का लग्न करणार यामागचं कारणही तिने सांगितलं आहे.

लग्नाबद्दल बोलतांना आयरानं सांगितलं की, ' त्यांना माहित आहे की ते 3 जानेवारीला लग्न करणार आहोत, पण आजपर्यंत त्यांनी कोणत्या वर्षी लग्न करणार हे ठरवलेल नाही.

हिच तारीख का हे सांगतांना  इरा म्हणाली की, 'ही तारीख आमच्यासाठी खास आहे कारण या दिवशी आम्ही पहिल्यांदा एकमेकांना किस केलं होतं.'

 इराचा बॉयफ्रेंड नुपूर हा एक फिटनेस ट्रेनर आहे. फिटनेस एक्स्पर्ट आणि कंन्सलटंट म्हणुन तो काम करतो. बऱ्याच वर्षांपासून तो आयराचा फिटनेस ट्रेनर म्हणून काम पाहत होता. त्याने केवळ आयराचं नव्हे तर सुष्मिता सेन आणि आमिर खानला देखील फिटनेसचे धडे दिले आहे. तर  इरानं 2019 मध्ये दिग्दर्शनात पदार्पण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT