Aamir Khan’s mom reviews ‘Laal Singh Chaddha’; actor says her opinion matters the most Google
मनोरंजन

'हटाओ इसे,क्या बनाया है'; लाल सिंग चड्ढा एडिट करण्याचा आईचा आमिरला सल्ला?

आमिर खान नेहमी पहिल्यांदा आपल्या आईला सिनेमा दाखवतो,कारण 'अम्मीची' प्रतिक्रिया त्याच्यासाठी महत्त्वाची असते असं तो एका मुलाखतीत म्हणाला आहे.

प्रणाली मोरे

बॉलीवूड अभिनेता आमिर खान(Aamir Khan) सिने इंडस्ट्रीत परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो. एक उत्तम कलाकार म्हणून त्यानं स्वतःची ओळख खूप भक्कम बनवली आहे. आमिरचा तब्बल तीन-चार वर्षांनी 'लाल सिंग चड्ढा' सिनेमा मोठ्या पडद्यावर आपल्या भेटीस येत आहे. त्यानं सिनेमातलं 'कहानी' हे गाणं सोशल मीडियावर नाही तर रेडिओवर हटके अंदाजात लॉंच केलं. यावेळी दिलेल्या मुलाखतीत त्यानं आपली आई झीनत हुसैनला जर सिनेमा आवडला नाही तर ती काय प्रतिक्रिया देते याविषयीनं अभिनेत्यानं मोठा खुलासा केला आहे.

आमिरचा 'लाल सिंग चड्ढा' सिनेमातलं 'कहानी' गाणं रेडिओवर लॉंच झाल्यावर आता त्याला पसंतीची दाद चाहत्यांकडून मिळताना दिसत आहे. या गाण्याला अमिताभ भट्टाचार्यने लिहिलं आहे. तर मोहन कनननं ते गाणं गायलं आहे. त्याच गाण्याच्या लॉंचला रेडिओ स्टेशनवर गेलेल्या आमिरनं आपल्या आईच्या सिनेमा पाहून प्रतिक्रिया देण्याविषयी मोठा खुलासा केला आहे. तो म्हणाला आहे, ''जेव्हा आईला माझा सिनेमा आवडत नाही तेव्हा ती लगेच म्हणते,'हटाओ इसको,क्या बनाया है?' अगदी क्यूट अंदाजात ती हे म्हणते'', असंही आमिर पुढे म्हणाला.

Aamir Khan's ' Lal Singh Chaddha' Movie Poster image

आमिर म्हणाला,''लाल सिंग चड्ढा आईला दाखवताना मनात धाकधूक होती. ती काय म्हणेल याची. नशिबानं ती म्हणाली नाही,'हटाओ इसे,क्या बनाया है'. ती म्हणाली,''आमिर तू कोणाचंच ऐकू नकोस. फिल्म मस्त बनली आहे,आहे तशी रिलीज कर. यात काहीच एडिट करू नकोस''. आमिरनं आवर्जुन नमूद केलं की सिनेमासाठी मला माझ्या आईची प्रतिक्रिया खूप महत्त्वाची ठरते.

आमिर खान आणि करिना कपूर खान अभिनित 'लाल सिंग चड्ढा' सिनेमा १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या हॉलीवूडच्या 'फॉरेस्ट गंप' या सिनेमाचा हिंदी रीमेक आहे. लाल सिंग चड्ढा सिनेमात नागा चैतन्य,मोना सिंग यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा सिनेमा ११ ऑगस्ट रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. अंद्वैत चंदननं या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs AUS : पथूम निसंका पहिला शतकवीर! श्रीलंका Super 8s मध्ये, ऑस्ट्रेलियाचे नशीब 'आयर्लंड'च्या हाती; जाणून घ्या समीकरण

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी ठरु शकते धोकादायक, 'हे' उपाय करा नाहीतर होईल मोठी हानी!

Muhammad Yunus Resigns : मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागारपदाचा दिला राजीनामा!

Mani Shankar Aiyar : ‘’मी गांधीवादी, नेहरूवादी, राजीववादी आहे, पण राहुलवादी नाही’’ ; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर थेटच बोलले..!

Pune Shivjayanti : रस्त्याच्या कामामुळे शिवजयंती मिरवणूक मार्गात बदल; महापौरांचे आदेश

SCROLL FOR NEXT