aanandi joshi and jasraj joshi marathi singer secret wedding SAKAL
मनोरंजन

Aanandi Joshi - Jasraj Joshi: मराठी गायिका आनंदी जोशी आणि जसराज जोशी यांनी गुपचुप उरकलं लग्न

आनंदी आणि जसराज गेल्या अनेक दिवसांपासुन रिलेशलनशीपमध्ये होते, अखेर या दोघांनी लग्न केलंय

Devendra Jadhav

Aanandi Joshi - Jasraj Joshi Wedding News: मराठी गायिका आनंदी जोशी आणि जसराज जोशी यांनी गुपचुप लग्न उरकलंय. आनंदी आणि जसराज गेल्या अनेक दिवसांपासुन रिलेशलनशीपमध्ये आहेत. अखेर या दोघांनी लग्नाची गुड न्यूज देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलाय.

आनंदी आणि जसराज हे गेल्या अनेक दिवसांपासुन रिलेशनशीपमध्ये आहेत. दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर पाहायला मिळतात. दोघांची लव्हस्टोरी नेमकी कधी सुरु झाली याविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही.

गेल्या अनेक महिन्यांपासुन दोघे विविध रोमँटीक फोटो सोशल मिडीयावर शेअर करत होते. पण दोघे अचानक लग्न करतील, असा अंदाज कोणी बांधला नव्हता. दोघांनी अचानक लग्न केल्याने त्यांच्या फॅन्सनी शुभेच्छांचा वर्षाव केलाय

अत्यंत आदराने, आम्ही जीवनाच्या नवीन टप्प्यात पाऊल ठेवत असताना तुम्ही सर्वांनी आम्हाला आशिर्वाद द्यावा अशी नम्रपणे विनंती करतो, अशी पोस्ट करत दोघांनी ही गुजन्युज दिलीय. दोघांच्या हातात कोर्टाचं मॅरेज सर्टिफिकेट दिसुन येतंय. याशिवाय मागे वधु - वराची सजावट केलेली दिसतेय.

दोघांनी मोजके नातेवाईक आणि मित्र - मैत्रिणींच्या उपस्थितीत लग्न केल्याची चर्चा आहे. आनंदीने तुझ्यात जीव रंगला अशा मराठी मालिकांचं शिर्षक गीत गायलंय. याशिवाय आनंदी गोपाळ, दुनियादारी अशा मराठी सिनेमांसाठी गायन केलंय. तर दुसरीकजे जसराज जोशीने सुद्धा YZ, आनंदी गोपाळ अशा सिनेमांसाठी गायन केलंय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Pub Fire : पबमध्ये मध्यरात्री भीषण अग्नितांडव, २७ जणांचा होरपळून मृत्यू, ६३ गंभीर जखमी; दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Constitutional Amendment India: मंत्रिपदावरून हटविण्याऐवजी निलंबन;प्रस्तावित १३०व्या घटनादुरुस्ती विधेयकाबाबत संसदीय समितीची शिफारस

शेतकऱ्यांना ३१ जुलैपूर्वी कर्जमाफी! ३ टप्प्यात कर्जमाफी, १५ लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार; पहिल्यांदा कर्जमाफी कोणाला? निकष काय बदलले, वाचा सविस्तर...

अर्थवेध : भारतीय गुंतवणूकदारांचा विजय; ‘एफआयआय’ युगाचा अस्त?

ढिंग टांग : वैशाखनंदन संवाद..!

SCROLL FOR NEXT