aanandi joshi and jasraj joshi secret wedding aanandi joshi comment on that SAKAL
मनोरंजन

Aanandi Joshi Wedding: प्रिय जसराज संघर्षाने भरलेल्या या जीवनात... गुपचुप लग्न केल्यावर गायिका आनंदी जोशीची पहिली प्रतिक्रिया

आनंदी जोशीने जसराजसोबत गुपचुप लग्न केल्यावर तिच्या भावना व्यक्त केल्यात

Devendra Jadhav

Aanandi - Jasraj Wedding News: आनंदी गोपाळ मराठी सिनेमातील सुमधुर गाणी गाऊन प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी गायक जोडी म्हणजे गायिका आनंदी जोशी आणि जसराज जोशी. आनंदी आणि जसराजने गुपचुप लग्न केल्याने त्यांच्या फॅन्सना सुखद धक्का बसला. या दोघांनी कोर्ट मॅरेज केलं.

आनंदीने जसराजसोबत लग्न केल्यावर तिने सोशल मिडीयावर एक सुंदर फोटो पोस्ट करुन तिच्या भावना व्यक्त केल्यात

(aanandi joshi and jasraj joshi secret wedding aanandi joshi comment on that)

आनंदी जोशीची नवरा जसराजबद्दल खास पोस्ट

आनंदी लिहीते.. "प्रिय जसराज, उत्कटतेने आणि संघर्षाने भरलेल्या या जीवनात, आनंदाचे दिवस आणि सतत पुढे जात राहावं लागतं. याशिवाय दररोज स्वत: चा शोध घ्यावा लागतो, अशा सगळ्या कोलाहलात तुझे अस्तित्व मुर्छानासारखे (मुर्छाना हे संगीताशी संबंधित आहे), ते शांत आणि समांतरपणे वाढत आहे, सर्वकाही अधिक सुंदर, शहाणे आणि खोल बनवत आहे, आणि अनादी आणि अनंतपासून हे अस्तित्वात आहे. मी भाग्यवान आहे की या सगळ्याचा शोध मी तुझ्यासोबत घेणार आहे खुप प्रेम."

आनंदी आणि जसराजने गुपचुप केलं लग्न

अत्यंत आदराने, आम्ही जीवनाच्या नवीन टप्प्यात पाऊल ठेवत असताना तुम्ही सर्वांनी आम्हाला आशिर्वाद द्यावा अशी नम्रपणे विनंती करतो, अशी पोस्ट करत दोघांनी ही गुजन्युज दिलीय. दोघांच्या हातात कोर्टाचं मॅरेज सर्टिफिकेट दिसुन येतंय. याशिवाय मागे वधु - वराची सजावट केलेली दिसतेय.

दोघांनी मोजके नातेवाईक आणि मित्र - मैत्रिणींच्या उपस्थितीत लग्न केल्याची चर्चा आहे. आनंदीने तुझ्यात जीव रंगला अशा मराठी मालिकांचं शिर्षक गीत गायलंय. याशिवाय आनंदी गोपाळ, दुनियादारी अशा मराठी सिनेमांसाठी गायन केलंय. तर दुसरीकजे जसराज जोशीने सुद्धा YZ, आनंदी गोपाळ अशा सिनेमांसाठी गायन केलंय

आनंदी - जसराजच्या लग्नावर फॅन्स खुश

आनंदी आणि जसराज हे गेल्या अनेक दिवसांपासुन रिलेशनशीपमध्ये आहेत. दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर पाहायला मिळतात. दोघांची लव्हस्टोरी नेमकी कधी सुरु झाली याविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही.

गेल्या अनेक महिन्यांपासुन दोघे विविध रोमँटीक फोटो सोशल मिडीयावर शेअर करत होते. पण दोघे अचानक लग्न करतील, असा अंदाज कोणी बांधला नव्हता. दोघांनी अचानक लग्न केल्याने त्यांच्या फॅन्सनी शुभेच्छांचा वर्षाव केलाय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT