aaradhya aishwarya rai bachchan spot at mumbai airport both going to paris fashion week  SAKAL
मनोरंजन

Aishwarya Rai - Aaradhya: मायलेकी निघाल्या पॅरीसला! ऐश्वर्याच्या खांद्यावर हात ठेवणाऱ्या आराध्याने लक्ष वेधलं, व्हिडीओ व्हायरल

ऐश्वर्या - आराध्याला मुंबई एअरपोर्टवर स्पॉट केले गेले

Devendra Jadhav

Aishwarya Rai - Aaradhya Bachchan News: ऐश्वर्या आणि आराध्या बच्चन या मायलेकी चांगल्याच चर्चेत असतात. अनेकदा इव्हेंट, पार्टीला या दोघी एकत्र दिसतात.

ऐश्वर्या कायमच लेक आराध्याला सांभाळताना आणि सपोर्ट करताना दिसते. या मायलेकी पुन्हा एकदा चर्चेत आल्यात. ते म्हणजे प्रतिष्ठित अशा पॅरिस फॅशन शोमध्ये या दोघी सहभागी होणार आहेत. यासाठी त्यांनी खास मेकओव्हर केलेला दिसतोय.

(aaradhya aishwarya rai bachchan spot at mumbai airport)

ऐश्वर्या - आराध्याचा फॅशन शोसाठी खास मेकओव्हर

पॅरिस फॅशन वीकमध्ये सहभागी होण्यासाठी ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची मुलगी आराध्या बच्चन आज मुंबईहून विमानाने निघाल्या. वृत्तानुसार, 3 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या फॅशन वीकचा भाग होण्यासाठी ऐश्वर्या मुलीसह पॅरिसमध्ये असेल.

पापाराझींनी ऐश्वर्या आणि आराध्याला मुंबई विमानतळाबाहेर क्लिक केले. आई-मुलीची जोडी एकदम स्टाईलिश आणि आरामदायक लूकमध्ये दिसल्या.

ऐश्वर्या - आराध्याची मॅचिंग जोडी

पापाराझींनी ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन यांना त्यांच्या कारमधून उतरताना विमानतळाबाहेर स्पॉट केले.

आई-मुलीच्या जोडीने एकमेकांचे हात धरले होते आणि कॅमेराकडे हसत त्यांनी फोटो क्लिक केले. ऐश्वर्याने संपूर्ण काळ्या पोशाखात अगदी सुंदर दिसत होती. तर आराध्या निळ्या रंगाच्या टीशर्टमध्ये आईच्या खांद्यावर हात ठेऊन चालत होती.

ऐश्वर्या रायचं वर्कफ्रंट

वर्कफ्रंट बद्दल बोलायचं झालं तर ऐश्वर्या या वर्षी पोनियन सेल्व्हन 2 (PS 2) सिनेमात दिसली. या सिनेमाने बॉक्स ऑफीसवर चांगली कामगिरी केली.

चोळ साम्राज्यावर आधारीत हा भव्य दिव्य सिनेमा मणीरत्नम यांनी दिग्दर्शित केला. या सिनेमाच्या दोन्ही भागांनी बॉक्स ऑफीसवर चांगली कामगिरी केली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT