aaradhya big b 
मनोरंजन

हॉस्पिटलमधून निघताना अमिताभ यांना नात आराध्या काय म्हणाली वाचा...

दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची मुलगी आराध्या बच्चन यांची कोरोनाची टेस्ट आता निगेटीव्ह आली आहे. दोघी हॉस्पिटलमधून घरी देखील पोहोचल्या आहेत. ही आनंदाची बातमी ऐकून अमिताभ बच्चन यांना आनंदाश्रु आले. त्यांनी ट्विट करुन चाहत्यांसोबत त्यांच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. त्यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिलंय की हॉस्पिटलमधून जाताना लहानगी आराध्या त्यांना काय सांगून गेली.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिलंय, ते घरी गेले. कोविड-१९ च्या संसर्गातून बरे झाले. माझ्या डोळ्यात अश्रु आले. लहानग्या आराध्याने मला जाताना सांगितलं की 'रडू नका, तुम्ही लवकर घरी परत याल. मला तिच्या या बोलण्यावर विश्वास ठेवायला हवा. '

अभिषेकने केलं होतं ट्विट-

अभिषेक बच्चनने ट्विट करुन याबाबत माहिती दिली होती की पत्नी ऐश्वर्या आणि मुलगी आराध्या यांची कोरोना टेस्ट आता निगेटीव्ह आली आहे आणि त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळत आहे. त्याने या ट्विटमध्ये असं देखील सांगितलं होतं की तो स्वतः आणि त्याचे वडिल अमिताभ अजुनही डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली हॉस्पिटलमध्ये राहणार आहेत. 

अमिताभ बच्चन यांनी ११ जुलैला कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती सोशल मिडियावरुन दिली होती. त्यानंतर अभिषेक बच्चन, सून ऐश्वर्या आणि नात आराध्या यांची कोरोनो टेस्ट पॉझिटीव्ह आली होती. बच्चन कुटुंबातील केवळ अमिताभ बच्चन यांच्या पत्नी आणि अभिनेत्री जया बच्चन सुरक्षित आहेत.   

aaradhya bachchan assures amitabh bachchan that he will get well soon  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT