Aashka Goradia Blessed With Baby Esakal
मनोरंजन

Aashka Goradia: आशकानं दिली गोड बातमी! पहिल्या मुलाचं केलं स्वागत

Aashka Goradia Blessed With Baby: टीव्ही अभिनेत्री आशका गोराडियाने सोशल मीडियावर चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी शेअर केली आहे.

Vaishali Patil

Aashka Goradia Blessed With Baby: टिव्ही मनोरंजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. नागिन फेम अभिनेत्री आशका गोराडिया ही आई झाली आहे. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. आशका गोराडिया आणि ब्रेंट ग्लोब यांनी त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत केले आहे. स्वत: अभिनेत्रीनेच या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

आशका गोराडिया आणि ब्रेंट ग्लोब यांनी सोशल मिडियावर पोस्ट शेयर करत ही गोड बातमी चाहत्यांनी दिली आहे. यासोबतच त्यांनी सोशल मिडियावर बाळाचा पहिला फोटो आणि नावही जाहिर केलं आहे.

हा फोटो पोस्ट करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'आज सकाळी 7:45 वाजता विल्यम अलेक्झांडर या जगात आला आणि थेट आमच्या हृदयात गेला. जरी मला माहित आहे की माझे जीवन या दिवसापूर्वीही अस्तित्वात होते, मला त्याबद्दल फारच कमी आठवते. आतापासून, मी मरेपर्यंत अॅलेक्सचा बाबा असेन.

देवाच्या कृपेने आशकाने त्याला जन्म दिला आहे. ती आता विश्रांती घेत आहे, तिच्या शेजारी आमचे लहान बाळ आहे. आमचे अंतःकरण इतके जड कधीच नव्हते. असे प्रेम मी कधीच पाहिले नाही. आणि आता दररोज, माझ्याकडे देवाच्या अस्तित्वाचा जिवंत पुरावा असेल.’’

आता त्यांची ही पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. चाहते या जोडाप्याचे कौतुक करत आहेत. जुही परमार, आमिर अली, रिद्धिमा पंडित, जन्नत जुबेर, किश्वर मर्चंटपासून मौनी रॉय अशा अनेक कलाकारांनी या जोडप्याचे अभिनंदन करत आहे.

1 डिसेंबर 2017 रोजी आशकाने ब्रेंट गोबलशी ख्रिश्चन आणि हिंदू पद्धतीने विवाह केला होता. ब्रेंट हा व्यवसायाने व्यापारी आहे. तर कुसुममधील 'कुमुद' आणि लागी तुझसे लगनमधील 'कलावती' या भुमिकेने आशका घराघरात पोहचली.

नागिन मालिकेतही तिने काम केले आहे. 'फिअर फॅक्टर: खतरों के खिलाडी', 'बिग बॉस' आणि 'नच बलिये' यांसारख्या रिअॅलिटी शोमध्येही ती दिसली आहे. काही दिवसांपुर्वी ती डायन मालिकेत दिसली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT