Aashram Actress Tridha Choudhary Wedding esakal
मनोरंजन

Tridha Choudhary : बाबाजींची 'बबिता' अडकणार लग्नबंधनात! 'आश्रम' फेम त्रिधा कुणाला करतेय डेट?

आता आश्रम या मालिकेतील बबिता उर्फ त्रिधानं लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

युगंधर ताजणे

Aashram Actress Tridha Choudhary Wedding : ज्यांनी प्रसिद्ध अभिनेत्री बॉबी देओलची आश्रम नावाची मालिका असेल त्यांना बाबाजी आणि बबिता कोण आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. लोकप्रिय दिग्दर्शक प्रकाश झा यांनी दिग्दर्शित केलेल्या या मालिकेनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतल्याचे दिसून आले. त्यावरुन मोठा वादही झाला होता.

आता आश्रम या मालिकेतील बबिता उर्फ त्रिधानं लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यापूर्वी आपल्या बोल्डनेसमुळे चर्चेत आलेल्या बबितानं आश्रम या मालिकेतून अमाप लोकप्रियता मिळवल्याचे दिसून आले आहे. अशातच तिच्या लग्नाच्या चर्चांना भलतेच उधाण आले आहे. यामुळे चाहत्यांनी त्रिधावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

त्याचे झाले असे की, त्रिधानं एका मुलाखतीमध्ये आपण पुढच्या वर्षी लग्न करणार असल्याचे संकेत दिले आहे. ती त्याच्यासोबत लग्न करणार आहे तो देखील मनोरंजन विश्वातीलच सेलिब्रेटी आहे. अनेकांना त्रिधाचा होणारा साथीदार कोण आहे याची कमालीची उत्सुकता असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्यांनी तिला मेसेज करुन त्याचे नाव सांगावे असेही म्हटले आहे.

त्रिधानं कलकत्ता टाईम्सला दिलेल्या त्या मुलाखतीमध्ये लग्नाविषयी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे ती लाईमलाईटमध्ये आली आहे. ती म्हणते, भलेही मी मनोरंजन विश्वातीलच त्या सेलिब्रेटीला डेट करत असले तरी आम्ही आमची प्रायव्हसी जपली आहे. एकमेकांचा आदर केला आहे. आमच्या नात्याचा, मैत्रीचा परिणाम कामावर होणार नाही याची काळजीही आम्ही घेतली आहे. पुढील वर्षी लग्नाचा विचार असल्याचे त्रिधानं म्हटले आहे.

पश्चिम बंगालच्या त्रिधानं हिंदी, बंगाली आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले असून तिनं २०१३ मध्ये श्रीजित मुखर्जी यांच्या मिशावर रोहस्यो नावाच्या चित्रपटातून पदार्पण केले होते. त्यानंतर तिनं २०१६ मध्ये स्टार प्लसवरील दहलीज मालिकेतून टीव्ही मनोरंजन विश्वात पाऊल ठेवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Decision Impact: ट्रम्पचा डाव उलटणार? TCS, Infosys, Wiproसह भारतीय IT कंपन्यांना झटका देताना अमेरिकाच अडचणीत?

Ranji Trophy : रवींद्र जडेजाचे खणखणीत शतक, रिंकू सिंगनेही पार केला तिहेरी आकडा; दोघांची फटकेबाजी अन् प्रतिस्पर्धी गार...

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींचा ज्ञानेश कुमार यांना इशारा; म्हणाले, ‘तुमची झोप उडाली आहे, आम्ही तुम्हाला सोडणार नाही’

Indian Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची मोठी संधी! ३,५४८ जागा; कोण अर्ज करू शकतं जाणून घ्या

भाजप नेत्याची काठ्या-दगडांनी मारहाण करत हत्या, ५-६ जणांनी घेरलं अन्....; धक्कादायक VIDEO समोर

SCROLL FOR NEXT