aastad kale and aditi sarangdhar sakal
मनोरंजन

दिल, दोस्ती : ‘मैत्री’ तर होणारच!

अभिनेता आस्ताद काळे आणि अभिनेत्री आदिती सारंगधर हे मनोरंजन सृष्टीतील दोन आघाडीचे कलाकार. ते २००५पासून एकमेकांना ओळखतात.

आस्ताद काळे, अभिनेता

अभिनेता आस्ताद काळे आणि अभिनेत्री आदिती सारंगधर हे मनोरंजन सृष्टीतील दोन आघाडीचे कलाकार. ते २००५पासून एकमेकांना ओळखतात.

- आस्ताद काळे, आदिती सारंगधर

अभिनेता आस्ताद काळे आणि अभिनेत्री आदिती सारंगधर हे मनोरंजन सृष्टीतील दोन आघाडीचे कलाकार. ते २००५पासून एकमेकांना ओळखतात. ‘वादळवाट’ मालिकेच्या वेळी त्यांची पहिली भेट झाली. त्यानंतरही त्यांनी दोन-तीन कलाकृतींमध्ये एकत्र काम केलं. आता त्यांचं ‘चर्चा तर होणारच!’ हे नाटक रंगभूमीवर गाजतंय.

आदिती म्हणाली, ‘मी ‘वादळवाट’ मालिकेच्या वेळी आस्तादला पहिल्यांदा भेटले. त्या मालिकेत त्यानं छोटीशी भूमिका साकारली होती, पण आमच्यात बोलणं वाढलं ते तो माझ्या दुसऱ्या घरी भाड्यानं राहायला आल्यावर. साधारण दोन-अडीच वर्षं तो माझ्या बोरिवलीच्या घरी भाड्यानं राहिला. त्यावेळी आमचं घरकामाच्या निमित्तानंच बोलणं व्हायचं. तो खूप स्पष्टवक्ता आहे. त्याची मतं परखडपणे मांडतो. लग्न झाल्यापासून तो थोडा शांत आणि आणखीन जबाबदार झाला आहे.

आता त्याच्या आयुष्याला एक शिस्त आली आहे. आम्ही मित्र-मैत्रिणीपेक्षाही जास्त चांगले सहकलाकार आहोत. बऱ्याच गोष्टींमध्ये आमची विचारसरणी अगदी वेगळी आहे. एक कलाकार म्हणून गेली अनेक वर्षं आम्ही एकमेकांना कलाकार म्हणून बघत आहोत, एकमेकांबद्दल आम्हाला आदर वाटतो, एकमेकांच्या कामाबद्दल आम्हाला कौतुक आहे. त्यामुळं आमचे हे भाव आमच्या कामात दिसतात. सहकलाकार म्हणून आमच्यातलं बॉण्डिंग खूप मस्त आहे. तसंच काम करताना आम्ही एकमेकांना सजेशन्सही देत असतो. तो खूप हुशार आहे, मेहनती आहे, भाषेवर त्याचं प्रभुत्व आहे, त्याचं पाठांतरही खूप चांगलं आहे. त्याचं 'पावनखिंड' चित्रपटातलं काम मला अतिशय आवडलं.’

आस्ताद म्हणाला, ‘अदितीचा स्वभाव अत्यंत समजूतदार आणि मनमिळाऊ आहे. ती थोडी टॉम बॉयही आहे. मनात एक आणि बोलण्यात एक असं तिचं काही नसतं. तिच्या जे मनात असंल ते ती खरं खरं बोलून मोकळी होते. इतक्या वर्षांच्या तिच्या करिअरमध्ये तिनं स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ती एक लोकप्रिय अभिनेत्री आहे, पण मला त्याप्रमाणंच वागवलं गेलं पाहिजे असं तिचं कधीही म्हणणं नसतं. कोणाला मदतीची गरज असल्यास आधी ती कायम त्या व्यक्तीच्या मदतीला धावून येते. ती अत्यंत नम्र आहे.

कामाच्या बाबतीतही ती खूप मेहनती आणि प्रामाणिक आहे. ''प्रपोजल'' या नाटकात माझी भूमिका आधी एक वेगळा अभिनेता करायचा पण त्याने ते नाटक सोडल्यावर ती भूमिका मी करायला लागलो. पण तिने मला ती भूमिका माझ्या पद्धतीने करायला मोकळीक दिली. तिनं मला छान सांभाळून घेतलं. ती खूप उत्स्फूर्त अभिनेत्री आहे आणि तिला दर प्रयोगाला वेगळं काहीतरी करून बघायचं असतं, पण तिला सुचलेल्या गोष्टी ती थेट प्रयोगात करत नाही. तर ते तिच्याबरोबर काम करणाऱ्या कलाकारांना आधी सांगते आणि तशी त्या जागेची प्रयोगाच्या आधी तालीम ही करते. तिची अनेक कामं मी पाहिली आहेत पण त्या सगळ्यात मला तिने 'प्रपोजल' या नाटकात साकारलेली भूमिका जास्त आवडली.’’

आता ही दोघं ‘चर्चा तर होणारच!’ या नाटकात एकत्र काम करत आहेत. या नाटकाबद्दल बोलताना आदिती म्हणाली, ‘या नाटकातली माझी भूमिका म्हणजे खऱ्या आयुष्यातला आस्ताद काळे. ती एक कार्यकर्ती आहे, पूर्णपणे नास्तिक आणि डाव्या विचारसरणीची मुलगी आहे. मी खऱ्या आयुष्यात अजिबात अशी नसल्यानं ही भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक आहे.’ तर, आस्तादनं सांगितलं, ‘हे एक चर्चा नाट्य आहे. नावावरून हे नाटक प्रेक्षकांना उपदेश करणारं वाटू शकतं, पण तसं अजिबात नाहीये.

दोन विरुद्ध विचारसरणीचे सामाजिक कार्यकर्ते, त्यांना एके ठिकाणी वाद विवादासाठी एकत्र आणलं जातं आणि मग पुढं त्यांच्यात होणारी चर्चा असं हे नाटक आहे. काही महत्त्वाचे विषय, मुद्दे या नाटकातून हलक्याफुलक्या पद्धतीने मांडले गेले आहेत. या नाटकात मी अत्यंत धार्मिक, देशभक्त, वर्षानुवर्षे सुरू असलेल्या परंपरांमध्ये कोणतेही बदल न करता पाळल्या गेल्या पाहिजेत, असे विचार असलेल्या कार्यकर्त्याची मी भूमिका साकारतोय. खऱ्या आयुष्यात मी अगदी विरुद्ध असल्यानं मी ही भूमिका साकारणं खूप एन्जॉय करतोय.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT