astad kale 
मनोरंजन

हर्षदा खानविलकरच्या घरी आस्ताद-स्वप्नालीचं केळवण; पाहा फोटो

स्वाती वेमूल

'बिग बॉस मराठी' सिझन १ फेम अभिनेता आस्ताद काळे आणि स्वप्नाली पाटील लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. या दोघांच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. लग्नाच्या तयारीची खरी सुरुवात ही केळवणापासूनच होते. स्वप्नालीच्या जिवलग मैत्रिणींनी केळवणासाठी या दोघांना घरी बोलावलं आणि त्यांचा पाहुणाचार केला. 

हर्षदा खानविलकर आणि शर्मिला शिंदे यांनी आस्ताद-स्वप्नालीचं केळवण केलं. लग्नाआधी वधू-वरांसाठी केलं जाणारं केळवण हे तर सगळ्यांनी एकत्र भेटण्याचं निमित्त असतं. वधू-वरांच्या आवडीचे पदार्थ करून जेवणासाठी पाहुण्यांकडे आमंत्रित केलं जातं. त्यानंतर एखादी भेटवस्तू देऊन लग्नाबाबत शुभेच्छा दिल्या जातात. शर्मिलाने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत या दोघांना आयुष्याच्या नव्या सुरुवातीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

आस्ताद आणि स्वप्नाली गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. आस्ताद सध्या 'चंद्र आहे साक्षीला' या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारतोय. यामध्ये सुबोध भावे आणि ऋतुजा बागवे प्रमुख भूमिकेत आहेत. तर स्वप्नाली 'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारतेय. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Abuse Case: पिंपळवंडीतील चिमुकलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ संतापाचा उद्रेक; पुणे-नाशिक महामार्गावर ग्रामस्थांचे रास्ता रोको

हातात डायमंड रिंग, सोबत मिस्ट्री मॅन; 'Ayesha Khan'च्या पोस्टने चाहत्यांना पाडलं कोड्यात! खरंच साखरपुडा केला? POST VIRAL

MPSC Success Story: दोन वर्षांपूर्वी अवघ्या ५ गुणांनी हुलकावणी; तिसऱ्या प्रयत्नात धनश्रीचे एमपीएससीत यश, शेतकऱ्याच्या मुलीची राज्यकर निरीक्षक पदाला गवसणी..

Marathi News Live Updates : मालेगाव-चाळीसगाव मार्गावर एसटी बस आणि आयशरची धडक; एकाचा मृत्यू, १० जखमी

स्वामिंग पूल, हिरवीगार झाडं... वंदना गुप्तेंच्या अलिबागमधल्या बंगल्याची खास झलक; नाटकाच्या टीमचं केलं जंगी स्वागत

SCROLL FOR NEXT