aastad kale and swapnali patil 
मनोरंजन

Photos : स्वप्नालीच्या हातावर रंगली आस्तादच्या नावाची मेहंदी

स्वाती वेमूल

अभिनेता आस्ताद काळे व स्वप्नाली पाटील लवकरच लग्नबंधनात अडकणार असून मेहंदीचा कार्यक्रम नुकताच पार पडला. स्वप्नालीच्या हातावर आस्तादच्या नावाची मेहंदी रंगली असून त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ऋतुजा गोडसेनं स्वप्नालीचं हे सुंदर फोटोशूट केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून आस्ताद व स्वप्नालीच्या केळवणाचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत होते. आता या दोघांच्या लग्नाची उत्सुकता चाहत्यांनाही लागली आहे. 

आस्ताद आणि स्वप्नाली गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. 'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या सिझनमध्ये आस्तादने भाग घेतला होता. या शोदरम्यान त्याने स्वप्नालीसोबतचं नातं जाहीर केलं. हे दोघंही अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. आस्ताद 'चंद्र आहे साक्षीला' या मालिकेत भूमिका साकारतोय तर स्वप्नाली 'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत आहे. 

आस्ताद आणि स्वप्नाली 'व्हॅलेंटाइन डे'ला म्हणजेच १४ फेब्रुवारी रोजी लग्नगाठ बांधणार आहेत. विशेष म्हणजे थाटामाटात विवाहसोहळा न करता दोघांनीही कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला आहे. लग्नकार्यावर भरपूर पैसा खर्च न करता नंतर काही महिन्यांनी मोठ्या ट्रिपला जायचा या दोघांचा प्लॅन आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT