abdu roziq bigg boss fame now seen in hindi serial Pyar Ka Pehla Naam Radha Mohan SAKAL
मनोरंजन

Abdu Rozik Hindi Serial: बिग बॉस गाजवणारा अब्दू झळकणार आता हिंदी मालिकेत, फॅन्सना उत्सुकता

बिग बॉस १६ गाजवणारा अब्दूच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी. अब्दू आता हिंदी मालिकेत झळकणार आहे.

Devendra Jadhav

Abdu Rozik Hindi Serial News: बिग बॉस १६ मधून अब्दू रोझीकने सर्वांची मनं जिंकली. उंचीने छोट्या असणाऱ्या अब्दूने बिग बॉस मध्ये कमाल केली. अब्दूचं बोलणं, त्याचा आवाज अशा अनेक गोष्टी प्रेक्षकांना भावल्या.

अब्दू आणि शिव ठाकरे यांच्या मैत्रीची चर्चा झाली. बिग बॉस १६ गाजवणारा अब्दूच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी. अब्दू आता हिंदी मालिकेत झळकणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, अब्दूला आता एका टीव्ही मालिकेत काम करण्याची संधी मिळाली आहे. अब्दू लवकरच छोट्या पडद्यावर अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे.

ताजिकिस्तानी गायक झी टीव्हीवरील 'प्यार का पहला नाम: राधा मोहन' या मालिकेत दिसणार आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अब्दू या मालिकेत छोटी भूमिका साकारताना दिसणार आहे.

अब्दूचे चाहते या बातमीने खूप खूश झाले आहेत. आणि त्यांना लवकरात लवकर त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटीला पडद्यावर पाहायचे आहे.

'प्यार का पहला नाम: राधा मोहन' मालिकेत शब्बीर अहलुवालिया आणि निहारिका रॉय मुख्य भूमिकेत आहेत.

शोच्या जवळचा एक स्रोत सांगतो, 'आगामी ट्रॅकमध्ये मोहन (शब्बीर अहलुवालिया) आणि तुलसीची (कीर्ती नागपुरे) मुलगी गुनगुन तिचा वाढदिवस साजरा करताना दिसेल. या ट्रॅकमध्ये दामिनी अब्दूला गुनगुनचे अपहरण करण्यासाठी पाठवते.

नंतर हे उघड होईल की अब्दूच्या पात्राचा गुनगुनला इजा करण्याचा हेतू नव्हता परंतु पैशासाठी दामिनीच्या सूचनेनुसार तो काम करतो. गुनगुन आणि अब्दू अखेरीस चांगले मित्र बनतील. वृत्तानुसार, अब्दुल उद्यापासून या कॅमिओ ट्रॅकचे शूटिंग सुरू करणार आहे.

अब्दू रोजीक आता भारतातील लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे. आपल्या सुरेल आवाजामुळे अब्दु जगभरातील लोकांचा लाडका झाला आहे.

दीर्घकाळापासून तो गायनाच्या जगात आपले कौशल्य दाखवत आहे. गाण्याच्या प्रतिभेने अब्दू पहिल्यांदा प्रसिद्धीच्या झोतात आले.

जगातील सर्वात तरुण गायकाचा किताब पटकावणाऱ्या अब्दूचे 'ओही दिल जोर' हे रॅप गाणे जगभरात लोकप्रिय झाले, त्यानंतर त्याला स्टारचा दर्जा देण्यात आला.

अब्दूने सलमान खान सोबत सुद्धा अभिनय केलाय. याशिवाय अलीकडेच खतरो के खिलाडीच्या (KKK १३) सेटवर तो दिसला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT