Abhay Deol  esakal
मनोरंजन

Abhay Deol : 'सगळ्यात विषारी माणूस म्हणजे अनुराग कश्यप!' अभयनं काढला वचपा

अभय देओलनं ज्या दिग्दर्शकाच्या चित्रपटातून प्रेक्षकांची पसंती मिळवली त्या अनुराग कश्यपवर टीका केली आहे.

युगंधर ताजणे

Abhay Deol : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता अभय देओल हा सध्या त्याच्या ट्रायल बाय फायरमुळे चर्चेत आला आहे. त्यामध्ये त्याच्या सोबत राधिका देशपांडे सह अभिनेत्री आहे. गेल्या काही दिवसांपासून ही वेबसीरिज प्रचंड चर्चेत आली आहे. आता अभय हा त्याच्या वक्तव्यामुळे नेटकऱ्यांच्या रडारवर आला आहे.

सोशल मीडियावर अभय देओल तसा फारसा बोलत नाही. किंवा इतर सेलिब्रेटींसारख्या पोस्ट शेयर करुन स्वताबद्दल अपडेटही देत नाही आपली येणारी सीरिज किंवा चित्रपट याविषयी पोस्ट करुन चाहत्यांना माहिती तेवढी मात्र देत असतो. आता त्यानं प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. त्यावरुन वादाला सुरुवात झाली आहे.

Also Read - प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

अभय देओलनं ज्या दिग्दर्शकाच्या चित्रपटातून प्रेक्षकांची पसंती मिळवली त्या अनुराग कश्यपवर टीका केली आहे. त्यामुळे चर्चेत आला आहे. अभयनं त्याला विषारी माणूस असे संबोधले आहे. सोशल मीडियावर अभयचं वक्तव्य व्हायरल झालं असून चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी त्याला वेगवेगळे प्रश्न विचारुन भंडावून सोडलं आहे. यावेळी अनुरागनं अभयवर जे आरोप केले होते त्यावही त्यानं उत्तर दिलं आहे.

अभयनं मीडियाशी बोलताना काही गोष्टींचा धक्कादायक खुलासा केला आहे. ती तीन वर्षांपूर्वी अनुरागनं त्याच्या एका मुलाखतीमध्ये अभयविषयी वक्तव्य केलं होतं. तो म्हणाला होता की, अभयसोबत काम करायचे हे सगळ्यात अवघड काम आहे. त्यामुळे तो अनुभव फारच वेदनादायी असल्याचे अनुरागचे म्हणणे होते.

अनुरागच्या त्या आरोपांवर अभय देओलनं उत्तर दिलं आहे. एका मुलाखतीमध्ये अभयनं खुलासा केला आहे. तो म्हणाला, अनुराग जे बोलतो आहे ते खोटे आहे. तो एक विषारी माणूस आहे. मी कधीही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहण्याची डिमांड त्याच्याकडे केली नाही. तोच माझ्याजवळ आला आणि म्हणाला की, तू देओल स्टार आहे. तेव्हा तुला एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्येच राहायला हवे.

मला अनुरागकडून खूप काही शिकायला मिळाले. ही गोष्ट मी मान्य करतो. पण त्याच्यासारख्या विषारी माणसांपासून मला सावध राहायला हवे हेही मी यानिमित्तानं शिकल्याचे अभयनं म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT