मनोरंजन

'लागिरं झालं जी'नंतर आता झी मराठीवरील 'ही' मालिका होणार बंद

वृत्तसंस्था

मुंबई : झी मराठीवरील सुबोध भावे आणि गायत्री दातार यांची मुख्य भूमिका असलेली मालिका ‘तुला पाहते रे’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. जुलै महिन्यापर्यंत ही मालिका संपणार असल्याचे खुद्द सुबोध भावेने सांगितले होते. आता मालिकेतील मायरा उर्फ अभिनेत्री अभिज्ञा भावेने मालिकेचे शुटिंग संपल्याचे सोशल मीडियाद्वारे सांगितले असल्याने मालिका बंद होणार यावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अभिज्ञाने तिच्या फेसबुक अकाऊंटवर मालिकेचे शुटिंग संपले असल्याचे सांगितले आहे. तिने विक्रांत सरंजामे उर्फ सुबोध भावे, गायत्री उर्फ इशा आणि मालिकेतील इतर कलाकारांसह फोटो पोस्ट केले आहेत. फोटो पोस्ट करताना ‘तुला पाहते रे’च्या आठवणी कायम माझ्यासोबत असतील. आपण शेवट काय होणार याचा कधीच विचार करत नाही. अभिज्ञाचा मालिकेतील मायरा या पात्राचा प्रवास आता संपलाय असे तिने फोटो शेअर करत लिहिले.

दरम्यान, गायत्री दातारने या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आणि पदार्पणातील तिच्या या भूमिकेने खूप लोकप्रियता मिळवली. सध्या मालिकेत इशाने विक्रांतला धडा शिकवण्यासाठी त्याची सर्व माणसे तोडली आहेत. विक्रांतच्या कृत्याचा त्याला पश्चाताप व्हायला हवा असा इशाचा हेतू असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेतकरीपुत्राने कसं उभारलं RCC क्लासेसचं १०० कोटींचं साम्राज्य, एक खोली ते ८ शहरांमध्ये विस्तार; कोण आहे शिवराज मोटेगावकर?

Akola News: पाच दिवस ‘हीटवेव्ह’चा इशारा; पारा ४६.३ अंशांवर : दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळा; आरोग्याला जपा

Latest Marathi News Live Update : आज विदर्भात उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता

Maharashtra Legislative Council: विधान परिषद निवडणुकीवरून महायुतीत त्रांगडे, शिवसेनेकडून चौघे इच्छुक: दराडेंना संधी मिळाल्यास भुजबळांची भूमिका महत्त्वाची..

Pune University News: डीटीएलच्या प्रश्नपत्रिकेचा ‘कॉपी-पेस्ट’ कारनामा; पुणे विद्यापीठाचा भोंगळ कारभार पुन्हा उघड, पुस्तकातील आठही प्रश्न जसेच्या तसे..

SCROLL FOR NEXT