girish oak 
मनोरंजन

'अग्गंबाई सूनबाई'ला ट्रोल करणाऱ्यांना 'अभिजीत राजें'चं सडेतोड उत्तर

स्वाती वेमूल

सोशल मीडियामुळे सेलिब्रिटी आणि चाहते यांच्यातील दरी कमी झाली. मात्र ट्रोलिंगचंही प्रमाण खूप वाढलंय. सर्वसामान्यांपेक्षा सेलिब्रिटींना ट्रोलर्सचा अधिक सामना करावा लागतो. त्यातही काही सेलिब्रिटी ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देतात तर काहीजण त्याकडे दुर्लक्षच करणं पसंत करतात. झी मराठी वाहिनीवरील 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेतील कलाकारांनाही सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलं. आता ही मालिका नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. यानिमित्त नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेते गिरीश ओक यांनी ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे. गिरीश ओक हे मालिकेत अभिजीत राजेंची भूमिका साकारत आहेत. 

"अग्गंबाई सूनबाई मालिकेतील माझी भूमिका थोडीफार बदलली आहे. आता अभिजीत राजेंना घरातलं सगळं सांभाळायचं आहे. पण त्यामुळे त्यांचा स्वभाव बदललेला नाही. ते आधीसारखंच आनंदाचा शोध घेणारे अभिजीत राजे आहेत", असं त्यांनी भूमिकेविषयी सांगितलं. 'मुंबई तक'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ट्रोलिंगवरही भाष्य केलं. "सध्या सोशल मीडियावर एखाद्याला ट्रोल करणं खूप सोपं झालंय. पण जेव्हा एखादी गोष्ट सोपी होते, तेव्हा त्याची किंमत राहत नाही. पण ते आपल्या मनाला किती लावून घ्यायचं हा आपापला प्रश्न असतो. कलेचं कौतुक कोणी करत नाही, फक्त टीका करतात. त्रस्त झालेले, नट किंवा दिग्दर्शक होऊ न शकलेले आपणच ग्रेट आहोत असं समजून ट्रोल करत असतात. पण मला माहितीये की मी चांगलं काम करतोय. सोशल मीडियावर हेतुपुरस्सर कमेंट्स खूप असतात. त्याकडे जितकं लक्ष देणार, तितका त्रास होतो. गजराज चालत असतो तेव्हा श्वान भुंकत असतात. पण गजराज त्याकडे लक्ष देत नाही", असं ते म्हणाले. 

१५ मार्चपासून 'अग्गंबाई सूनबाई' ही मालिका सुरू झाली आहे. यामध्ये गिरीश ओक, निवेदिता सराफ, उमा पेंढारकर आणि अद्वैत दादरकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या नव्या मालिकेत शुभ्राची भूमिका उमा तर सोहम ऊर्फ बबड्याची भूमिका अद्वैत साकारतोय. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shreyas Iyer: श्रेयस अय्यर आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळाडूंशी संवाद साधण्यास उत्सुक; जपानविरुद्ध ऐतिहासिक टी-२० सामन्याचीही उत्सुकता

ED Raid Karnataka: जारकीहोळींच्या घरी ‘सार्वजनिक’ची कागदपत्रे अन् लाखोंचे परदेशी चलन; ईडीच्या छाप्यात काय काय आढळलं?

बाप तो बाप रहेगा! बाईबद्दल विधान शिंदेंच्या आमदाराला भोवणार, मध्यरात्री गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : खंबाटकी घाटातील नवीन बोगद्यातून वाहतूक सुरू; एकेरी मार्गामुळे आज वाहनांची मोठी कोंडी

Indian Army Success Story: १३ वेळा अपयश, पण जिद्द कायम! १४व्या प्रयत्नात अनिकेत झाला भारतीय सैन्यात लेफ्टनंट, अपयशाला हरवत यशाला गवसणीचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT