Bigg Boss News
Bigg Boss News 
मनोरंजन

"असे शंभर सलमान मी उभे करेन, माझी गल्ली झाडायला"; अभिजीत बिचुकले भडकला

स्वाती वेमूल

वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेला अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) नुकताच 'बिग बॉस १५'मधून (Bigg Boss 15) बाद झाला आहे. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये अभिजीत आणि देवोलिना भट्टाचार्जी या दोघांचं एलिमिनेशन झालं. रश्मी देसाई, देवोलिना आणि अभिजीत यांना 'तिकीट टू फिनाले' मिळू शकला नाही. बिग बॉसच्या घरात असतानाही बिचुकले विविध कारणांमुळे चर्चेत होता. आता घराबाहेर पडल्यानंतर त्याने सूत्रसंचालक सलमान खानवर (Salman Khan) आरोप केले आहेत. "सलमानला कोणी मोठं झालेलं बघवत नाही. त्यासारखे शंभर सलमान मी दारात उभं करेन माझी गल्ली झाडायला", अशा शब्दांत त्याने सलमानवर निशाणा साधला आहे. (Abhijit Bichukale expressed anger on salman khan)

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, "बिग बॉसच्या घरात माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला. सलमानला वाटतं की तोच शो चालवतो. मात्र हा पंधरावा सिझन मी गाजवला आणि इथे तो कमी पडला. त्याने जशी भाषा वापरली ती आजपर्यंत मला कोणी वापरली नाही. पिंजऱ्यात वाघ आहे, म्हणून तो हंटर फिरवत होता, आता वाघ पिंजऱ्याबाहेर आला आहे. मी काय आहे, हे सलमानला लवकरच दाखवून देईन."

बिचुकलेनं बिग बॉसच्या घरातही सलमानविरोधात वक्तव्यं केली होती. यासाठी सलमाननेही त्याला धारेवर धरलं. सलमान त्याला म्हणाला, ''तू अर्वाच्च भाषेत तुझ्या कुटुंबाशी बोलशील का? पुन्हा जर अशी भाषा मी ऐकली तर तुझे केस ओढून मी घराबाहेर खेचत आणून तुला मारेन.'' त्यावर अभिजित म्हणाला,' 'मी बोलू का?'' तेव्हा सलमान त्याच्यावर आणखी कडक भाषेत डाफरला. यावर बिचुकले बिथरला अन् तडक उठून घराच्या दरवाजाजवळ जाऊन तो तावातावानं उघडायला सांगू लागला होता.

स्वत:ला कवी मनाचा नेता म्हणवून घेणाऱ्या अभिजीत बिचुकलेनं आत्तापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या आहेत. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनाही त्यानं कित्येकदा खुलेआम आव्हान दिलंय. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यानं मुंबईतील वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) विरोधात अपक्ष उमेदवार म्हणूनही निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्याला अवघी 150 मतं मिळाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दमदार सुरुवातीनंतर दिल्लीला दोन मोठे धक्के! फ्रेझर-मॅकगर्कनंतर शाय होपही बाद

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT