Abhinav Bindra Biopic News
Abhinav Bindra Biopic News Abhinav Bindra Biopic News
मनोरंजन

अभिनव बिंद्राच्या जीवनावर लवकरच चित्रपट; हर्षवर्धन कपूर मुख्य भूमिकेत

सकाळ डिजिटल टीम

Abhinav Bindra Biopic News अभिनव बिंद्राच्या (Abhinav Bindra) बायोपिकची घोषणा होऊन बराच काळ लोटला आहे. पाच वर्षे झाली आहेत. खरं तर चित्रपट रखडला आहे अशी चर्चा होती. मात्र, ही चर्चा हर्षवर्धन कपूरने (Harshvardhan Kapoor) आता फेटाळून लावली आहे. बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा पहिला विजेता अभिनव बिंद्राची भूमिका हर्षवर्धन कपूर साकारणार आहे.

‘मला वाटते की तुम्ही माझ्या वडिलांना चित्रपटाबद्दल विचारले पाहिजे. या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तेच उत्तम व्यक्ती आहे. कारण, तेच या चित्रपटाची निर्मिती करीत आहे. आम्ही निश्चितपणे चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करीत आहोत. पुढील वर्षाच्या सुरुवातीला चित्रपटाचे चित्रीकरण करू’ असे हर्षवर्धन कपूर म्हणाला.

‘चित्रपटासाठी खूप तयारीची आवश्यक आहे. प्रामाणिकपणे सांगितले तर थारच्या शूटिंगमध्ये व्यस्त होतो. त्याच्या आधीही हा चित्रपट व्हायला हवा होता. आम्ही पुढे गेलो आणि मध्ये दोन चित्रपट बनवले. परंतु, अभिनव बिंद्रा (Abhinav Bindra) यांची बायोपिक सुरू करू शकलो नाही. ही खूप मोठी जबाबदारी आहे’ असेही हर्षवर्धन कपूर (Harshvardhan Kapoor) म्हणाला.

‘हे मोठ्या पडद्यावर एखाद्या वास्तविक जीवनातील व्यक्तीची भूमिका करण्यासारखे आहे. आयुष्यात खरा खेळाडू होण्यासाठी १५ ते २० वर्षांच्या कालावधी लागतो. या पेक्षाही जास्त कालावधी लागू शकतो. या भूमिकेसाठी खूप मेहनत घेणार आहे. थार सारख्या प्रोजेक्टसाठी आम्ही राजस्थानला जाऊन दोन महिने शूटिंग केले आणि ते एकाच वेळी पूर्ण केले. त्याचप्रमाणे आम्ही मुंबईत २० दिवसांत शूटिंग केले. परंतु, हा चित्रपट खूप मोठा आहे, असेही हर्षवर्धन कपूर म्हणाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: पहिल्या वादळी पावसामुळे रेल्वे वाहतुकीचे तीन तेरा; मुंबईकरांचे दिवसभर अतोनात हाल!

लोकशाहीसाठी राज्यभर राबवली 'निर्भय बनो' मोहिम; पण विश्वंभर चौधरी स्वतः मतदानापासून राहिले वंचित; कारण काय?

GT vs KKR Live Score IPL 2024 : पावसाचा जोर कामय, गुजरात - केकेआर सामन्यावर संकट

Ghatkopar Hoarding: घाटकोपर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT