Ghoomer Title Song  Esakal
मनोरंजन

Ghoomer Title Song: 'घूमर' घुमला अन् अभिषेकमध्ये डान्स रंगला.. टायटल सॉन्गची पहिली झलक !

Vaishali Patil

Ghoomer Title Song Out: बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर यांचा आगामी चित्रपट 'घूमर' चांगलाच चर्चेत आहे. काही दिवसांपुर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला, ज्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसादही मिळाला.

आता निर्मात्यांनी या सिनेमाचा टायटल ट्रॅक रिलीज केला आहे. जो रिलीज होताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घूमर या टायटल ट्रॅकमध्ये सैयामी खेरचा संघर्ष आणि विजयाचा प्रवास दाखवण्यात आला आहे.

या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून प्रशंसा मिळालीच मात्र त्याबरोबरच जागतिक क्रिकेट आयकॉन्सकडून देखील चित्रपटाचं कौतुक झालं आहे.

घूमर हे गाणं अमित त्रिवेदी यांनी संगीतबद्ध केलेले आहे. तर कौसर मुनीर यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहे. तर दिपाक्षी खलिता आणि अल्तमश फरीदी यांनी हे गाणं गायलं आहे.

" घूमर" मध्ये अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर प्रमुख भूमिकेत आहेत. शबाना आझमी आणि अंगद बेदी यांच्या सह भूमिका यात बघायला मिळणार आहे. दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांचे या चित्रपटात कॅमिओ करतील. शिवेंद्र सिंग आणि इवांका दास यांच्याही खास भूमिका यात आहेत.

अभिषेक यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवर 'घूमर' गाणे शेयर केलं आहे. मेलबर्न 2023 च्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये (IFFM) 'घूमर' प्रदर्शित होणार आहे.

आर. बाल्की यांनी दिग्दर्शित घूमर हा होप प्रॉडक्शन आणि सरस्वती एंटरटेनमेंट निर्मित आहे. हा चित्रपट 12 ऑगस्ट रोजी हॉयट्स, डॉकलँड्स येथे प्रदर्शित होणार आहे. घूमर 18 ऑगस्ट 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

मध्यपूर्वेत तणाव वाढला, पुन्हा युद्धाला सुरुवात! अमेरिकेकडून १४० हून अधिक ठिकाणांवर हल्ले, इराणचंही प्रत्युत्तर...

INDW vs ENGW Test: जे सचिन, विराटला नाही जमलं, ते पोरीनं करून दाखवलं! यास्तिका भाटीयाने लॉर्ड्स कसोटीत इतिहास घडवला

Ashadhi Wari Accident Aid: आषाढी वारीतील अपघाती मृत्यू प्रकरणी चंद्रपूरच्या वारकऱ्याच्या वारसांना ४ लाखांची मदत; विठ्ठल रखुमाई वारकरी योजना २०२५ अंतर्गत मंजुरी

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

SCROLL FOR NEXT