Aishwarya Bachchan & Abhishek Bachchan Google
मनोरंजन

सोशल मीडियावर ट्रोलर्सना फटकारायला अभिषेक घेतो ऐश्वर्याची मदत

'दसवी' सिनेमाच्या निमित्तानं अभिषेक बच्चननं वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील अनेक गोष्टींवर दिलखुलास संवाद साधला आहे.

प्रणाली मोरे

अभिषेक बच्चन सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय पहायला मिळतो. त्यामुळे अर्थातच जशी त्यांची प्रशंसा केली जाते तसंच त्याला अनेकदा ट्रोलही केलं जातं. पण अभिषेक ट्रोलिंगला बऱ्याचदा उत्तर देताना दिसतो तेही ट्रोलर्सला चांगलंच फटकारून. आणि ट्वीटरवर त्याला चांगलंच ट्रोलर्सला टोकताना पाहिलेलं आहे. नुकताच अभिषेकनं सोशल मीडियावर ट्रोलर्सना कसं सामोरं जायचं याविषयी ऐश्वर्या आपल्याला मार्गदर्शन करते याचा खुलासा केला आहे.

तो म्हणाला,''माझी बायको ऐश्वर्या मला म्हणाली,तुला १०००० चांगल्या प्रतिक्रिया मिळतात पण एक-दोन वाईट प्रतिक्रियांचा सामना करावा लागतो. तु नेहमी चांगल्या प्रतिक्रियांचा विचार कर आणि सकारात्मक गोष्टींचा आनंद घे. त्यानंतर मी या सगळ्या ट्रोलिंगकडे त्यादृष्टींन पहायला लागलो. मी सकारात्मक,चांगल्या प्रतिक्रिया मनावर घेतो. तुम्ही अपयशाला टाळू शकत नाही,तो मात्र नेहमी तुमच्या आड येण्याचा प्रयत्न करतो. पण त्यातनं बाहेर कसं यायचं हे मात्र जमायलाच हवं. मी अपयशाला,माझ्यावरील टीकांना माझ्यावर आरुढ होऊ देत नाही. मी आता त्यांच्याकडे सकारात्मक नजरेने पाहतो. जे माझ्यासाठी खूप फायद्याचं ठरलं. माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातही''. म्हणजे आता ट्रोलर्सना अभिषेक देत असलेली उत्तर ऐश्वर्याकडून सुचवलेली असतात हे स्पष्ट झालंय. पण असो,ऐश्वर्यानं जो सकारात्मक राहायचा सल्ला त्याला दिलाय तो आपल्या साऱ्यांनाचा लागू होतो नाही का.

ऐश्वर्यानं अशा पद्धतीनं अभिषेकला पूर्ण बदलून टाकलं. अभिषेक पुढे म्हणाला,''माझं माझ्या कुटुंबावर प्रेम आहे,तसं अनेकांचं असतं. त्यामुळे मी नेहमी सिनेमा निवडताना माझ्या कुटुंबाच्या,मुलीच्या दृष्टिनेही विचार करतो'' असं देखील अभिषेकनं आवर्जुन नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Babasaheb Patil RBI action : सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर RBIची कारवाई; नियमांचे उल्लंघन केल्याने जिल्हा बँकेच्या संचालकपदावरून बडतर्फ?

धावती लोकल पकडायला गेला, अचानक तोल जाऊन ट्रेनखाली येणार इतक्यात...; RPF जवानांनी तरुणाला दिले जीवनदान, Video Viral

Western Ghats Biodiversity : सह्याद्रीच्या कुशीत दडलाय अमूल्य खजिना! आजरा परिसरात सापडल्या शेकडो दुर्मीळ औषधी वनस्पती; टाटा संस्थेकडून सर्वेक्षण

Latest Marathi News Update : गोकुळ निवडणुकीमध्ये भाजप सर्व 25 जागांवर उमेदवारी अर्ज भरणार

दुष्काळात कुणी खाईना का? ५०-६० रुपयांचे ड्रायफ्रूट्स, राईचा पर्वत करायची काय गरज? काजू-बदाम खाणाऱ्या खासदाराची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT