IFFM 2023: Abhishek Bachchan, Saiyami Kher Starrer 'Ghoomer' Gets Standing Ovation At Opening Night Esakal
मनोरंजन

Ghoomer In IFFM 2023: अभिषेकच्या 'घूमर'चा मेलबर्न फिल्म फेस्टिव्हलमध्ये जलवा!

इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न (IFFM) 2023 मध्ये आर बाल्की यांनी दिग्दर्शित केलेल्या घूमर चित्रपटाचे प्रिमियर करण्यात आले.

Vaishali Patil

Ghoomer At Indian Film Festival of Melbourne: बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन त्याच्या आगामी चित्रपट 'घूमर'मुळे चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर आणि टायटल साँग रिलीज करण्यात आले होते. जे प्रेक्षकांना खुप आवडले होते. जो रिलीज होताच सोशल मीडियावर या चित्रपटाची चर्चा होतीच. आता सध्या चित्रपटाची टिम चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

त्यातच आता घुमर चित्रपटाचा पहिला प्रिमियर हा मेलबर्न फिल्म फेस्टिव्हलमध्ये करण्यात आला. भारतीय चित्रपट महोत्सव मेलबर्न म्हणजेच IFFM सोहळ्याचे ऑस्ट्रेलियात आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्याला केवळ बॉलीवूडनेच नव्हे तर साउथच्याही अनेक कलाकारांनी हजेरी लावली. याच IFFM मध्ये घुमर चित्रपट रिलिज झाला.

या चित्रपटाने सगळ्यांची मन जिंकून स्टँडिंग ओव्हेशन मिळवले आहे. तेथील प्रेक्षकांना हा सिनेमा आवडला. सर्वांनीच अभिषेक बच्चन, सयामी खेरच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. घुमर च्या टीम ने मेलबर्न मधील MCG स्टेडियम ला देखील भेट दिली असून " घुमर " च्या चर्चा आता सातासमुद्रापार पोहचल्या आहेत.

चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचं झालं तर अभिषेक बच्चन प्रशिक्षकाच्या भुमिकेत आहे. सयामी ही एका अपंग क्रिकेटपटूची भूमिका साकारताना दिसत आहे जी एका वेळी आत्महत्येचा प्रयत्न करते आणि नंतर देशाची महान खेळाडू बनते. तिचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.

आर बाल्की यांनी दिग्दर्शित हा सिनेमा येत्या 18 ऑगस्टला रिलीज होणार आहे. अभिषेक बच्चन, सयामी खेर, अंगद बेदी यांच्या मुख्य भूमिका या चित्रपटात आहे. क्रिकेटवर आधारित असलेला हा सिनेमा अनेक भावनांनी गुंफलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT