Abhishek Bachchan  
मनोरंजन

"मी अभिनेता म्हणून योग्य नाही असं त्यांना वाटत असेल तर.."; ट्रोलर्सना अभिषेकचं उत्तर

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिषेक बच्चन ट्रोलिंगविषयी झाला व्यक्त

स्वाती वेमूल

अभिनेता अभिषेक बच्चनला Abhishek bachchan अनेकदा सोशल मीडियावरील ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. या ट्रोलिंगला न जुमानता सडेतोड उत्तर देत त्याने वेळोवेळी टीकाकारांचं तोंड बंद केलं. नुकताच त्याचा 'बॉब बिस्वास' Bob Biswas हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटानिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत तो ट्रोलिंगविषयी व्यक्त झाला. "जर तुमचं असं मत असेल की मी चांगला अभिनेता नाही, तर जेव्हा मी चांगला अभिनेता होईन तेव्हा तुमचं मत आपोआप बदलेल. ट्रोलिंगकडे बघण्याचा माझा हाच दृष्टीकोन आहे. प्रत्येकाची आपापली मतं असतात", असं अभिषेक 'बॉलिवूड लाइफ'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.

ट्रोलिंगविषयी तो पुढे म्हणाला, "हे सर्वजण जर तिकिट विकत घेऊन माझा चित्रपट बघायला जात असतील आणि त्यांना असं वाटत असेल की आणखी चांगलं काम करू शकतो किंवा आता चांगलं काम करत नाही, तर हे माझं कर्तव्य आहे की मी त्यांचं ऐकावं आणि स्वत:च्या अभिनय कौशल्यात बदल आणावेत."

अनेकदा अभिषेकची दहा वर्षांची मुलगी आराध्यालाही सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. मुलीला ट्रोल केल्यास अजिबात सहन करणार नाही, असं त्याने स्पष्ट केलं. "माझ्या मुलीला ट्रोल केल्यास ते मी सहन करणार नाही आणि ते मी अजिबात स्वीकारू शकत नाही. मी पब्लिक फिगर असल्याने ते मला ट्रोल करू शकतात पण माझ्या मुलीवर टीका करण्याचा त्यांना अधिकार नाही. जर तुम्हाला खरंच काही बोलायचं असेल तर माझ्यासमोर येऊन बोला आणि तेव्हा मी पाहीन की तुमच्यामध्ये खरंच किती हिंमत आहे", अशी रोखठोक भूमिका त्याने मांडली. अभिषेकने ऐश्वर्या रायसोबत २००७ मध्ये लग्न केलं. २०११ मध्ये ऐश्वर्याने आराध्याला जन्म दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT