paash 
मनोरंजन

अभिषेक बॅनर्जीच्या 'पाश'ची उत्तम कामगिरी,ऑस्करच्या शर्यतीत समावेश

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- बॉलीवूड अभिनेता अभिषेक बॅनर्जीच्या नावावर आता एक उत्तम कामगिरीचा शिक्का बसणार आहे. त्याचा 'पाश' हा सिनेमा ऑस्करच्या शॉर्ट फिल्म विभागात भारताकडून समाविष्ट झाला आहे. एड्स सारख्या गंभीर मुद्द्यावर बनलेल्या या सिनेमात अभिनेता अभिषेक बॅनर्जी मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमात तो एका ट्रक ड्राटव्हरच्या भूमिकेत आहे ज्याला एड्सचा संसर्ग होतो. १३ मिनिटाच्या या शॉर्ट फिल्ममध्ये एड्स रुग्णाचा दुःख दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. 

एका प्रसिद्ध वेबसाईटशी बोलताना अभिषेक बॅनर्जीने ऑस्करच्या शर्यतीत सिनेमाचा समावेश झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. त्याने म्हटलंय, ''मी खरंच या गोष्टीमुळे खूप आनंदी आहे की आमचा सिनेमा ऑस्करच्या शॉर्ट फिल्म विभागात भारताकडून सामिल झाला आहे.'' अशा या आनंदाच्या क्षणी अभिषेकने जुने दिवस आठवत म्हटलंय, ''मला आजही लक्षात आहे की शाळे एका टिचरने माझ्या अभिनयाची खिल्ली उडवली होती.आणि सांगितलं होतं की तु हेच कर कारण शिक्षण तुझ्या क्षमतेच्या बाहेर आहे. तेव्हाच मी ठरवलं होतं की मी अभिनय क्षेत्रात मी माझं नाव कमवेन. आता मी त्या टिचरला जाऊन भेटेन आणि त्यांचा आशिर्वाद घेईन ज्यांच्यामुळे अभिनयाला  मी माझं पॅशन आणि करिअर दोन्ही बनवलं.''  

अभिषेकने त्याच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 'रंग दे बसंती' सिनेमात एक छोटीशी भूमिका साकारत केली होती. या भूमिकेसाठी त्याला त्याची पहिली कमाई १५०० रुपये मिळाली होती. आज मागे वळून पाहिल्यावर असं वाटतं की माझे स्ट्रगलचे दिवस संपले अशी भावना अभिषेकने व्यक्त केली.    

abhishek banerjee short film paash enters oscars race  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: घुसखोरांना बाहेर पाठवणार; मोदी, काँग्रेसने बिहारींचा अपमान केला, विरोधकांना विकास असह्य

ST Bus Ticket Price Hike: एल्फिन्स्टन पूल कामाचा प्रवाशांना भुर्दंड, एसटी तिकीट दरात २० रुपयांची वाढ!

दूध, तूप अन् लोणी होणार स्वस्त! मदर डेअरीचा मोठा निर्णय, GST कपातीनंतर दरात केले बदल

High Court: राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी होत आहे का? उच्च न्यायालय, राज्य शासनाला तीन आठवड्यात मागविले उत्तर

'IND vs PAK सामना १५ ओव्हरनंतर बंदच केला, कारण...', सौरव गांगुलीचं मोठं व्यक्तव्य

SCROLL FOR NEXT