abhishek deshmukh emotional post for sister amruta deshmukh wedding with prasad jawade  SAKAL
मनोरंजन

Amruta - Prasad Wedding: बहिणीची पाठवणी करताना अभिषेक भावूक, सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला...

प्रसाद जवादे - अमृता देशमुख यांचं नुकतंच लग्न झालं

Devendra Jadhav

प्रसाद जवादे - अमृता देशमुख हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय कपल. या दोघांनी मित्र - मैत्रीण आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत काल थाटामाटात एकमेकांशी लग्न केलं. दोघांच्या लग्नाला अनेक मराठी कलाकार उपस्थित होते.

अमृताचा भाऊ अभिषेक देशमुख सुद्धा अभिनेता आहे. अभिषेक सध्या आई कुठे काय करते मालिकेत अभिनय करतोय. बहिणीची पाठवणी करताना अभिषेकने सोशल मीडियावर खास पोस्ट करत तिला शुभेच्छा दिल्या.

(abhishek deshmukh emotional post for sister amruta deshmukh wedding)

अभिषेकने लाडक्या बहिणीला दिल्या शुभेच्छा

अभिषेक देशमुखने सोशल मीडियावर अमृता - प्रसादच्या लग्नसोहळ्यातले फोटो पोस्ट केलेत. या फोटोत अभिषेक बहिणीच्या मागे उभा असलेला दिसतो.

हे फोटो पोस्ट करुन अभिषेक लिहीतो, "अमृता..खुप खुप आनंद,प्रेम आणि शुभेच्छा! तुम्हा दोघांना सदिच्छा आणि आशिर्वाद," अशी पोस्ट करत अभिषेकने अमृताला शुभेच्छा दिल्यात.

प्रसाद - अमृताच्या लग्नाला मराठी कलाकारांची उपस्थिती

प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख यांच्या लग्नाला मराठी कलाकारांनी उपस्थिती दर्शवली. दोघांचे अनेक मित्र इंडस्ट्रीत आहेत. त्यामुळे दोघांच्या लग्नाला नम्रता संभेराव, ओंकार राऊत, सिद्धार्थ खिरीड, आशुतोष गोखले, प्रार्थना बेहेरे हे कलाकार उपस्थित होते.

या सगळ्या कलाकारांनी अमृता - प्रसादच्या लग्नात धम्माल केली. प्रसाद - अमृताच्या हळद - मेहंदी - संगीत अशा अनेक विधींमध्ये हे सर्व कलाकार उपस्थित होते.

अशी झाली प्रसाद - अमृताच्या लव्हस्टोरीची सुरुवात

प्रसाद जवादे - अमृता देशमुख हे बिग बॉस मराठी 4 मध्ये सहभागी होते. या शोमध्ये प्रसाद - अमृतामध्ये चांगली मैत्री झाली. दोघांमध्ये अनेक वाद - विवादही झाले. शोनंतर मात्र दोघे एकमेकांचे चांगले मित्र झाले.

आणि अचानक दोघांनी साखरपुड्याचे फोटो पोस्ट करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. अखेर आज प्रसाद - अमृताने एकमेकांशी लग्न करुन सहजीवनाची सुरुवात केलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई-कोकण दुवा आणखी मजबूत होणार! महत्त्वाच्या खाडी पूल प्रकल्पाला गती; आता अंतर कमी अन् वेळही वाचणार, पाहा संपूर्ण आराखडा...

India vs Pakistan सामना १४ जूनला! ICC च्या निर्णयाने सर्वांना झटका; १२ संघांचा समावेश असलेल्या मोठ्या स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक

Latest Marathi News Live Update : पुणेकरांचे आरोग्य धोक्यात, धूळ आणि धूर यामुळे अनेकांना श्वासनाचे आजार

Mars Transit in Aquarius 2026: कुंभ राशीत 45 दिवस मंगळाचा प्रभाव; मेष, कन्यासह अनेक राशींचे भाग्य उजळणार; जाणून घ्या तुमचं राशिभविष्य

Nashik Ring Road : शेतकऱ्यांच्या जमिनीवर गदा नको; खासदार राजाभाऊ वाजेंच्या मध्यस्थीनंतर रिंगरोडचा मार्ग बदलणार?

SCROLL FOR NEXT