abhishek
abhishek 
मनोरंजन

जर अभिषेक 'बच्चन' नसता म्हणणा-या ट्रोलरला अभिषेकनेचं केलं ट्रोल

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई-  बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन सोशल मीडियावर अनेकदा ऍक्टीव्ह असल्याचं पाहायला मिळतं. वेगवेगळ्या पोस्ट करत तो चाहत्यांशी गप्पा देखील मारत असतो. अभिषेकला बऱ्याचवेळा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. कित्येकवेळा तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर असतो. मात्र जेवढा तो ट्रोल होण्यासाठी प्रसिद्ध आहे तेवढाच तो ट्रोलर्सना हजरजबाबपणे उत्तर देण्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. नुकताच एका यूजरने सोशल मीडियावर अभिषेकला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता. पण अभिषेकने दिलेल्या उत्तराने तो यूजर स्वत:च ट्रोल झाला आहे.

सोशल मीडियावर एका यूजरने एएनआयचा एक फोटो शेअर केला होता. हा फोटो एका शेतकऱ्याचा असल्याचं म्हटलं जातंय. फोटोमधील ही व्यक्ती अभिषेक बच्चन सारखी दिसत असल्याचं त्या यूजरनं म्हटलंय. ''जर अभिषेक 'बच्चन' नसता तर'' या आशयाचं ट्विट करत त्याने अभिषेकला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.

अभिषेकने नेहमीप्रमाणे ट्रोलरना उत्तर देण्याचं ठरवलं. अभिषेक या यूजरला जशाच तसं उत्तर दिलंय.. त्याने ‘हाहाहा खूप मजेशीर आहे. पण तरीदेखील मी तुझ्यापेक्षा चांगला दिसतो’ अशा आशयाचं उत्तर अभिषेकने दिलं असून त्या यूजरलाच ट्रोल केलं आहे. सध्या सोशल मीडियावर अभिषेकने दिलेल्या उत्तराची जोरदार चर्चा सुरु आहे.

abhishek reply when troller shares pic of farmer and writes if abhishek was not bachchan  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT