acterss Kananga ranaut on share post pappu in same team accidentally sharing secret document by Greta Thunberg 
मनोरंजन

आंदोलनाच्या बाजूनं बोलणारी पप्पूची टीम; विदूषकांचा बाजार सगळा

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - दिल्लीत शेतक-यांचे आंदोलन सुरु आहे. जवळपास दोन महिन्यांपासून चाललेल्या या आंदोलनावर इतक्या दिवसांपासून शांत बसलेले बॉलीवूडचे सेलिब्रेटी आता जागे झाले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर त्या घटनेवर त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. यासगळ्यात अभिनेत्री कंगणानं ज्या परदेशी कलावंत आणि सोशल अॅक्टिवेस्टनं दिलेल्या प्रतिक्रियांवर कडाडून टीका केली आहे. तसेच शेतकरी आंदोलनावर बोलणा-या परदेशी कलावंतांचा तिनं समाचार घेतला आहे. कंगणानं आपल्या शैलीत त्यांना सुनावले आहे. काल पासून परदेशातील काही कलाकारांनी दिल्लीतील शेतक-यांच्या आंदोलनावर सोशल मीडियावर घेतलेली भूमिका पाहून भारतीय कलावंतांनी सोशल मीडियावर पुढाकार घेतला आहे. 

शेतकरी आंदोलनाचा आवाज परदेशात जाऊन पोहचला आहे. मात्र भारतातल्या सेलिब्रेटींना त्याचे काही देणे घेणे नसल्याचे दिसून आले आहे. आतापर्यत अमेरिकन गायिका रेहाना, मिया खलिफा, पर्यावरण क्षेत्रात मोठे काम असणारी ग्रेटा थनबर्ग यांनी शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला आहे. त्यांच्यावर अभिनेत्री कंगणानं टीका केली आहे. कंगणानं सोशल मीडियावर यासंबंधी आपले मत व्यक्त केले आहे. त्यात तिनं ग्रेटाला लक्ष्य केलं आहे. ती म्हणते, या बुध्दिमान मुलीनं आता डाव्या विचारसरणीच्या लोकांना मोठ्या संकंटात टाकले आहे. ती तिची मोठी चूक म्हणावी लागेल. आता वैश्विक पातळीवर भारताला बदनाम करण्याचा कट केला जातोय असे वा़टायला लागले आहे. त्यासाठी वेगवेगळे सेलिब्रेटी पुढे येत आहेत.

जे कोणी बोलत आहेत ती सगळी पप्पुची टीम आहे. विदूषकांचा बाजार आहे सगळा. कंगणानं ज्या व्टिटला हे उत्तर दिले होते ते व्टिट आता डिलीट करण्यात आले आहे. ग्रेटानं शेतक-यांच्या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. तिनं म्हटले आहे की, आम्ही भारतात चाललेल्या आंदोलनाच्या पाठीशी आहोत. त्यानंतर कंगणानं एक गुगल डॉक्युमेंट फाईल शेयर केली होती. त्या फाईलमध्ये सोशल मीडिया कँपेनचे शेड्युल्ड शेयर केले होते. त्या फाईलला तिनं टूलकिट असे म्हटले होते. अशाप्रकारे भारत सरकारवर आंतरराष्ट्रीय पातळीवरुन चाललेला दबाव निर्माण करण्याची योजना असल्याचे सांगण्यात येत आहे. असे कंगणानं सांगितले.

आतापर्यंत शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी मीना हॅरिस, ग्रेटा थनबर्ग, रिहाना, मिया खिलीफा यांनी सोशल मीडियावरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. यासगळ्या प्रकरणावर अखेर विदेशी मंत्रालयानं सांगितले आहे की, कुठल्याही गोष्टीची पूर्णपणे माहिती नसताना त्यावर टिप्पणी करणे चूकीचे आहे. जे काही घडते आणि दिसते आहे ते सगळे बरोबर आहे असे समजण्याची चूक करु नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डबल डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

OCD Explained: OCD म्हणजे फक्त स्वच्छतेशी संबंधित नाही! डॉक्टरांनी सांगितले ऑब्सेसिव्ह कंपलसिव्ह डिसॉर्डरचे खरे स्वरूप

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Dashavatar: दशावतार चित्रपटात दाखवलेला तो 'राखणदार' कोकणात खरंच असतो का? काय आहे परंपरा?

Crime News : सिन्नरमधील वायर चोरी प्रकरणी दोघांना अटक; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT