actor Aamir Khan Elli Avrams Pic Koi Jaane Na Song Har Funn Maula Viral 
मनोरंजन

आमीरचे 'हरफन मौला' व्हायरल, 'कोई जाने ना' 26 मार्चला होणार प्रदर्शित 

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - बॉलीवूडचा प्रसिध्द अभिनेता आमीर खान याच्या कोई जाने ना चित्रपटातील हरफन मौला गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्या गाण्यात त्याच्या जोडीला अभिनेत्री एली एव्हरामही दिसत आहे. सोशल मीडियावर काही तासांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या गाण्याला मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळायला सुरुवात झाली आहे. ठग्स ऑफ हिंदूस्थान नंतर आमीरचा एकही चित्रपट आलेला नाही. त्यामुळे त्याच्या आगामी चित्रपटांची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. आमीरचा बहुचर्चित असा लाल सिंग चढ्ढा  प्रेक्षकांच्या कुतूहलाचा विषय आहे.

हरफन मौला या गाण्याचा टीझर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात आमीरचा एक वेगळा लुक  प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्याचा कोई जाने ना नावाचा चित्रपट येत्या 26 मार्चला प्रदर्शित होणार आहे. त्यात अलाय अवराम, नेहा महाजन, आश्विनी काळसेकर यांच्या भूमिका आहेत. जेव्हा या गाण्याचा टीझर प्रदर्शित झाला तेव्हापासून आमीरच्या चित्रपटाचे वेध प्रेक्षकांना लागले आहे. हे पूर्ण गाणं 10 मार्चला प्रदर्शित होणार आहे.

गाण्यामध्ये आमीरचा एक रोमँटिक लुक पाहायला मिळणार आहे. टी सीरिजच्या वतीने तो प्रदर्शित केला जाणार आहे. त्यात आमीरचा डान्सही सुंदर झाला आहे. अनेक वर्षानंतर तो अशाप्रकारच्या लुकमध्ये दिसणार आहे. यापूर्वी तो सिक्रेट सुपरस्टार आणि दंगलमध्ये वेगळ्या अंदाजात दिसला होता. त्यातील दंगल हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला होता. एका सत्यघटनेवर हा चित्रपट बेतला होता. त्याला केवळ भारतातच नव्हे तर जगभरात तो लोकप्रिय झाला  होता. हरफन मौला गाण्यात आमीरच्या जोडीला एलाय एव्हरामही आहे. तिया आणि आमीरचा डान्स चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

आमीरच्या या चित्रपटातील हे गाणे पाहिल्यानंतर प्रेक्षकांना त्याच्या या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. अमिताभ भट्टाचार्य यांनी हे गीत लिहिले असून तनिष्क बागची यांनी संगीत दिले आहे. 
 
 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT