actor abhijeet kelkar shared post for mns chief raj thackeray for raj taking initiative for mumbai goa national highway  sakal
मनोरंजन

Raj Thackeray: म्हणून राज ठाकरेंना 'साहेब' म्हणावंसं वाटतं.. अभिनेत्याची ही पोस्ट वाचाच..

अभिनेता अभिजीत केळकरने राज ठाकरे यांच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.

नीलेश अडसूळ

abhijeet kelkar: मराठी मनोरंजनविश्वातील एक लोकप्रिय चेहरा म्हणजे अभिनेता अभिजीत केळकर. अनेक मालिका आणि चित्रपटातून त्याने महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. सोशल मीडियावरही तो बराच सक्रिय असतो. आज त्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासाठी एक खास पोस्ट केली आहे. या पोस्टने साऱ्यांचेच लक्ष वेधले आहे.

(actor abhijeet kelkar shared post for mns chief raj thackeray for raj taking initiative for mumbai goa national highway)

सध्याच्या राजकारणाला सारेच वैतागले आहेत. कधी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर वाद होतोय तर कधी भ्रष्टाचार.. कधी पक्षांमधील वाद चव्हाट्यावर येत आहेत तर कधी राजकारण्यांच्या खासगी गोष्टी.. त्यामुळे सध्याचे वातावरण ढवळून निघाले आहे, शिवाय कोण कधी कोणत्या पक्षात जाईल आणि कोण कुणाशी दगा करेल काहीच भरोसा राहिलेला नाही. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीने सर्वांचेच लक्ष वेधले. यावरून बऱ्याच राजकीय चर्चा रंगल्या. पण झाले काही भलतेच..

राज ठाकरे यांनी राजकीय उद्देशाने भेट घेतल्याचे वावडे उठले. पण नंतर त्यावर पडदा पडला. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे कोकण दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांना मुंबई कोकण रस्त्यावरच्या दुरवस्थेचा अनुभव आला. गेली १० वर्ष या रस्त्याचे काम सुरूच आहे. ते अजून काही पूर्णत्वास गेलेले नाही. त्यामुळेच ही काम तातडीने व्हावे म्हणून राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.

मुंबई महानगरपालिका व अन्य निवडणुका जवळ आल्याने राज ठाकरे यांनी युती करण्यासाठी ही भेट घेतली का अशा चर्चा उठल्या. पण याचे खरे कारण समोर आल्यानंतर सर्वांनीच राज यांचे कौतुक केले. राज ठाकरेंनी कोकण महामार्गाच्या कामात लक्ष घातल्यामुळे अभिजीत केळकरने त्यांचे कौतुक केलं आहे.

राज ठाकरेंच्या या बातमीचा फोटो अभिजीतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या पोस्टला त्याने ''म्हणून यांना मनापासून ‘साहेब’ म्हणावसं वाटतं… धन्यवाद राजसाहेब” असे कॅप्शन दिले आहे. अभिजीतने राज ठाकरेंसाठी केलेली ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.

गेल्याच रविवारी, ११ नोव्हेंबर रोजी मुंबई-नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन करण्यात आलं होतं. त्यावेळी अभिजीतने 'आमचं कोकणही समृद्धीची वाट बघतंय… गेली १२ वर्ष' अशा आशयाची पोस्ट केली होती. त्यामुळे आता आशेचा किरण दिसल्याने त्याने पुन्हा एक पोस्ट लिहिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rekha Gupta : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर जीवघेणा हल्ला, जनता दरबार सुरु असताना हल्लेखोर आला अन्...

Satara Rain update:'कराड-पाटण तालुक्यात मुसळधार; कराड-चिपळूण मार्ग वाहतूक बंद, अडकलेले कोकणात जाणारे 150 प्रवासी एसटी बसमधून रवाना

HDFC Bank Alert: HDFC ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; बँकेच्या अत्यावश्यक सेवा दोन दिवस बंद राहणार

Pune Rain Update: पुण्यात पावसाचा हाहाकार! एकता नगरमध्ये पाणी शिरलं, खडकवासल्यातून विसर्ग वाढला

Rain-Maharashtra Latest live news update: मालेवाडी परिसरात पूरस्थिती, सोळा गावांचा संपर्क तुटला

SCROLL FOR NEXT