Actor Abhinav Choudhary
Actor Abhinav Choudhary  
मनोरंजन

वैमानिक अभिनव चौधरी यांच्याऐवजी अभिनेत्याला वाहिली श्रद्धांजली

स्वाती वेमूल

पंजाबच्या मोगा जिल्ह्यात गुरुवारी रात्री मिग-२१ बायसन (MiG-21 crash) फायटर विमान कोसळलं. या अपघातात स्क्वॉड्रन लीडर अभिनव चौधरी Abhinav Choudhary शहीद झाले. नावातील साम्यामुळे अनेक नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर टेलिव्हिजन अभिनेता अभिनव चौधरीला श्रद्धांजली वाहिली. अनेकांनी अभिनेता अभिनवला टॅग करत त्याला श्रद्धांजली वाहिली. नंतर अभिनवने सोशल मीडियावर पोस्ट लिहित नेटकऱ्यांना स्पष्ट केलं. 'मला अनेकजण मेसेज करत आहेत आणि श्रद्धांजली वाहत आहेत. पण मी पायलट अभिनव चौधरी नसून अभिनेता अभिनव चौधरी आहे. अभिनव यांना गमावणं हे देशासाठी सर्वांत दु:खदायक आहे', अशी पोस्ट त्याने लिहिली. (Actor Abhinav Choudhary Dismisses Death Rumours After Netizens Confuse Him With IAF Pilot Abhinav Choudhary)

नाव आणि आडनाव सारखे असल्याने नेटकऱ्यांची गल्लत झाली आणि अनेकांनी अभिनेता अभिनव चौधरीला श्रद्धांजली वाहिली. हे मेसेज पाहून अनेकांनी अभिनवच्या गावीसुद्धा फोन करून चौकशी केली. नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींनीही फोन केल्याचं अभिनवने सांगितलं. इतकंच नव्हे तर अभिवनला स्वत: घरी कॉल करून रडणाऱ्या आईला तो सुखरुप असल्याचं स्पष्टीकरण द्यावं लागलं.

भारतीय हवाई दलाचे मिग-२१ बायसन विमान मुसळधार पावसात पंजाबच्या मोगा जिल्ह्यातील शेतात २१ मे रोजी कोसळले. त्यामध्ये वैमानिक स्क्वॉड्रन लीडर अभिनव चौधरी यांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. राजस्थानमधील सूरतगड इथून प्रशिक्षणासाठी झेपावलेले हे विमान गुरुवारी रात्री लांगेआना गावात कोसळले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Praful Patel : ''होय, 2004 पासून भाजपशी युती व्हावी म्हणून मी आग्रही होतो'', प्रफुल्ल पटेलांनी सगळाच इतिहास काढला

SRH vs PBKS Live Score : अभिषेक-क्लासेनची शानदार खेळी, हैदराबाद विजयासह प्लेऑफमध्ये; मात्र पंजाबची पराभवासह सांगता

Farooq Abdullah: फारुख अब्दुल्लांच्या सभेत चाकूहल्ला; 3 कार्यकर्ते जखमी, दोघांची स्थिती गंभीर

काँग्रेसमध्ये धुसफूस! मल्लिकार्जुन खरगेंच्या फोटोला काळे फासले, अधीर रंजन चौधरींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज

जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेच्या मतदानापूर्वी दहशतवाद्यांचा हल्ला! भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू, तर एक दाम्पत्य जखमी

SCROLL FOR NEXT