Arjun Bijlani with wife Neha Swami Google
मनोरंजन

अभिनेत्याची टी.व्ही शो मध्ये कबुली; पत्नीला गर्भपातासाठी केलं होतं मजबूर

'स्मार्ट जोडी' या कार्यक्रमात अभिनेता अर्जुन बिजलानी आणि पत्नी नेहा स्वामी सेलिब्रिटी कपल म्हणून सहभागी झाले आहेत.

प्रणाली मोरे

अभिनेता अर्जुन बिजलानी(Arjun Bijlani) आणि त्याची पत्नी नेहा स्वामी (Neha Swami) सध्या स्टार प्लस वरील 'स्मार्ट जोडी' कार्यक्रमात सेलिब्रिटी कपल म्हणून सहभागी झाले आहेत. याच शो दरम्यान अर्जुननं एक मोठा खुलासा केला आहे. आपल्याला मुल नको हवं होतं त्यामुळे आपण आपल्या पत्नीचा गर्भपात करायला निघालो होतो असं नॅशनल टेलिव्हिजनवर अभिनेता अर्जुन बिजलानीनं मान्य केलं आहे. पण त्यामागे एक कारण होतं याचा खुलासाही त्यानं केलाय. काय म्हणाला आहे अर्जुन बिजलानी? त्यानं पत्नीला गर्भपात करण्यासाठी का सांगितलं होतं? जाणून घेऊया.

'स्मार्ट जोडी'च्या टीमनं शोच्या नव्या प्रोमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत अर्जुन बिजलानी सांगत आहे की,''माझी पत्नी आई होणार आहे हे मला अशा वेळी कळलं ज्यावेळी मी आर्थिक अडचणीचा सामना करीत होतो. तेव्हा मी एक निर्णय घेतला की आमच्या पहिल्या बाळाला जन्म द्यायचा नाही. आणि हेच सध्याच्या परिस्थितीत योग्य ठरेल''. अर्जुनने पुढे सांगितले,''आमचं लग्न होऊन एक वर्ष झालं होतं आणि आम्हाला कळलं की आम्ही आई-बाबा होणार आहोत. त्या एक-दीड वर्षात मी काही काम करीत नव्हतो. आणि एका बाळाला जन्म देणं ही खूप मोठी जबाबदारी असते. त्यामुळे मला त्यावेळी बाळाला जन्म देणं योग्य वाटलं नाही''.

अर्जुन हे सांगत असताना त्याची पत्नी नेहा खूप भावूक झालेली त्या व्हिडीओत दिसत आहे. तिच्या डोळ्यातनं अश्रूही आले. अर्जुन पुढे म्हणाला,''नेहा पहिल्यांदा खूप रडली. पण नंतर तिनं मान्य केलं. माझ्या अकाऊंटमध्ये फक्त ४० ते ५० हजार रुपये शिल्लक राहिले होते. आम्ही तडक हॉस्पिटलं गाठलं,गर्भपात करण्यासाठी''. प्रोमोमध्ये अर्जुन फक्त इतकेच बोलताना दिसत आहे. पण हॉस्पिटलला पोहोचल्यानंतर पुढे काय घडलं हे मात्र शो पाहिल्यावरच लक्षात येईल.अर्जुन बिजलानी आणि नेहानं खूप वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २० मे,२०१२ ला लग्न केलं. त्यानंतर २०१५ ला त्यांनी एका मुलाला जन्म दिला . ज्याचं नाव आयान असं ठेवण्यात आलं. तर मग हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर नेहा-अर्जुनने आपला निर्णय बदलला का? पुढे काय घडलं. हे शो पाहिल्यावरचं कळेल. आता मात्र व्हायरल झालेला अर्जुन बिजलानीचा शो मधील प्रोमो या बातमीत जोडलेला आहे. तो नक्की पहा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT