ajay devgn Sakal
मनोरंजन

Bholaa Box Office Collection: अजय देवगणच्या 'भोला'ने 50 कोटींचा आकडा केला पार, जाणून घ्या सहाव्या दिवसाची कमाई

बॉलीवूड अभिनेता अजय देवगण आणि तब्बूचा चित्रपट भोला बॉक्स ऑफिसवर संथ गतीने चालत आहे.

Aishwarya Musale

बॉलीवूड अभिनेता अजय देवगण आणि तब्बूचा चित्रपट भोला बॉक्स ऑफिसवर संथ गतीने चालत आहे. रामनवमीच्या दिवशी भोला रिलीज झाला होता. अजय देवगणने स्वतः या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अॅक्शन-थ्रिलर भोलाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.

या चित्रपटाने 11 कोटींची ओपनिंग केली होती आणि आता सहाव्या दिवशी चित्रपटाच्या कमाईचा आकडा 50 कोटींच्या पुढे गेला आहे. वीकेंडला भोलाच्या कमाईत कमालीची झेप होती, मात्र सोमवार आणि मंगळवारी कमाईचे आकडे मंद झाले. भोलाने मंगळवारी किती कोटींचा व्यवसाय केला ते जाणून घेऊया.

अजय देवगणचा भोला चित्रपट वीकेंडला चांगला होता पण आता चित्रपटाच्या कमाईचा वेग मंदावला आहे. सहाव्या दिवशी भोलाची कमाई फारच कमी होती. रिपोर्टनुसार, भोलाने मंगळवारी म्हणजेच 6 व्‍या दिवशी 4.50 कोटी कमावले आहेत. भोलाने सोमवारी 4.50 कोटींची कमाई केली होती. मात्र, आत्तापर्यंत भोलाची एकूण कमाई ५३.२८ कोटी झाली आहे.

भोलाच्या कमाईचा वेग मंदावला असला तरी चित्रपटाचे लाइफ टाईम कलेक्शन 100 कोटी असू शकते असे मानले जाते. हा चित्रपट 50 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला असून येत्या 2 वीकेंडमध्ये कोणताही मोठा चित्रपट रिलीज न झाल्याने हा चित्रपट 100 कोटींच्या आसपास पोहोचू शकतो.

आता 21 एप्रिलला सलमान खानचा 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अशा स्थितीत भोला 100 कोटींच्या जवळपास पोहोचण्याची शक्यता आहे.

अजय देवगण आणि तब्बूची जोडी चाहत्यांनी मागील अनेक चित्रपटांमध्ये पसंत केली आहे. भोलामधील तब्बूच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. या चित्रपटात अजय देवगण आणि तब्बू व्यतिरिक्त दीपक डोबरियाल, संजय मिश्रा, अमला पॉल, गजराज राव आणि इतर अनेक कलाकारांनी आपले उत्कृष्ट अभिनय कौशल्य दाखवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Ambulance Crash: भीषण विमान दुर्घटना!,रांचीहून दिल्लीला निघालेली 'एअर अ‍ॅम्ब्यूलन्स' घनदाट जंगलात कोसळली

Team India Semi Final Scenario : टीम इंडियाला नेट रन रेट रडवणार! झिम्बाब्वेविरुद्ध ११ षटकं अन् विंडीजविरुद्ध १८३ धावांनी विजय... तिसरं समीकरणही लैय अवघड

Onion Rate Issue : कांदा उत्पादकांना एकरी ५० हजारांचा तोटा; शेतकऱ्यांत बाजारभावाअभावी चिंता, उत्पादन खर्च भागविण्याचाही प्रश्न

Bangladesh Politics : पंतप्रधान तारिक रहमान यांचा मोहम्मद युनूस यांना मोठा धक्का!

Yavatmal News : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या एप्रिलमध्ये होणार; सीईओंचे गटविकास अधिकार्‍यांना पत्र

SCROLL FOR NEXT