actor ajay devgn tanhaji the unsung warrior movie and shushant Singh Rajput awarded by dadasaheb falke awards for critics best actor  
मनोरंजन

'तान्हाजी:द अनसंग वॉरियर्स' ची बाजी, सुशांतचा दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरव

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - भारतीय चित्रपट क्षेत्रात मानाच्या दादासाहेब फाळके पुरस्कारांचे वितरण नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी बॉलीवूडमधील वेगवेगळ्या कलाकारांचा सन्मान करण्यात आला. आपल्या चित्रपट कारकीर्दित फाळके यांच्या नावाचा पुरस्कार मिळवायचा अशी अनेक कलाकारांची इच्छा असते. यंदा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतला दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरविण्यात आले आहे.

मुंबईत शनिवारी दादासाहेब फाळके पुरस्काराचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी सुशांतला क्रिटिक्स बेस्ट अवॉर्ड देण्यात आला आहे. याशिवाय ज्या चित्रपटानं गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली अशा अजय देवगनची मुख्य भूमिका असलेल्या 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर्स' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला आहे. तसेच 'लक्ष्मी' चित्रपटासाठी अभिनेता अक्षय कुमारला उत्कृष्ट अभिनेता तर 'छपाक'चित्रपटासाठी दीपिका पादुकोणला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

कोरोनामुळे या पुरस्काराचे वितरण काही काळ लांबणीवर पडले होते. अद्यापही कोरोनाचं सावट मनोरंजन क्षेत्रावर घोंघावताना दिसत असले तरी अनेक निर्माते आणि दिग्दर्शक यांनी जोमानं चित्रपट निर्मितीला  सुरुवात केली आहे.  दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पुरस्कार वितरण याविषयी पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यात यंदाच्या वर्षी पुरस्कार प्राप्त विजेत्यांची यादीही देण्यात आली आहे. सुशांतला त्याचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा' साठी 'क्रिटिक्स बेस्ट एक्टर'  हा पुरस्कार देण्यात आला आहे.

 दोन दिवसांपूर्वी बॉलीवूडचा प्रसिध्द अभिनेता केके मेनन यानेही सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेअर केली होती. त्यालाही अभिनयाचे पारितोषिक मिळाले होते. सुशांतला पुरस्कार मिळाल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी आपल्या आवडत्या अभिनेत्याच्या काही आठवणींना उजाळा दिला आहे.  सुशांतने 14 जून 2020 ला आपल्या राहत्या घरी  गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याने 'काई पो छे', 'धोनी' आणि छिछोरे' यांसारख्या चित्रपटांत उत्कृष्ट भूमिका साकारल्या होत्या.

याशिवाय बॉलीवूडमधील इतरही काही कलाकारांचा यावेळी गौरव करण्यात आला. त्यात  दीपिका पादुकोणला (उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार), अक्षय कुमार (उत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कार) यांचा समावेश आहे. चाहत्यांनी आपल्या आवडत्या कलाकाराला मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. त्या कलाकारानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन चाहत्यांना धन्यवाद दिले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT