actor ajay purkar new marathi natak friend request soon in theatres  SAKAL
मनोरंजन

Friend Request Natak: एका फ्रेंड रिक्वेस्टने आयुष्याला कलाटणी! अजय पूरकरांचं नवं नाटक लवकरच रंगभूमीवर

अजय पूरकर यांचं नवीन नाटक रंगभूमीवर पाहायला मिळणार आहे.

Devendra Jadhav

Friend Request Marathi Natak: सोशल मिडीयाच्या फेसबुक, इन्स्टाग्राम सारख्या माध्यमातून ‘फ्रेन्ड रिक्वेस्ट’ पाठवून नवनवीन मित्रांच्या ओळखी करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.

कधी कधी आलेली एखादी अनोळखी 'फ्रेन्ड रिक्वेस्ट' तुमचं आमचं आयुष्यही बदलू शकते. तुमचा विश्वास बसत नाही का ? मग रंगभूमीवर येणारे ‘सवाईगंधर्व’, ‘जमदग्नीवत्स’ आणि 'व्यास क्रिएशन्स' या तीन संस्थांची निर्मिती असणारे ‘फ्रेन्ड रिक्वेस्ट’ हे नाटक तुम्हाला पहावे लागेल.

या नाटकाचे लेखन प्रसाद दाणी यांचे असून दिग्दर्शन कुमार सोहोनी यांचे आहे. अभिनेते अजय पुरकर, आकाश भडसावळे तसेच शैलेश देशपांडे, वैशाली गायकवाड हे या नाटकाचे निर्माते आहेत.

चौघांचं आयुष्य एका 'फ्रेन्ड रिक्वेस्ट' ने कसं बदलत जातं हे दाखवतानाच नात्यांचे वेगवेगळे कंगोरे आणि बंध यांचा उलगडा करणारं 'फ्रेन्ड रिक्वेस्ट' हे सस्पेन्स, इमोशनल, कॉमिक अशा विविध मिश्रणाचं नाटक आहे. प्रसिद्ध अभिनेते आशिष पवार, मालिका अभिनेत्री प्रियांका तेंडोलकर, अभिनेते अतुल महाजन आणि बाजीप्रभू, सुभेदार या भूमिका रंगवणारे अभिनेते अजय पुरकर हे या नाटकात मध्यवर्ती भूमिकेत आहेत.

मोजक्याच मंडळींसोबत आजच्या पिढीचं नाटक करण्याच्या मिळालेल्या संधीमुळे या नाटकाची निर्मिती आणि अभिनय अशा दोन्ही बाजू सांभाळल्याचं अभिनेते अजय पुरकर सांगतात. दुधारी शस्त्र असलेल्या सोशल माध्यमाचा वापर आपण कशाप्रकारे करतो? हे खूप महत्त्वाचं ठरतंय. एखादी आलेली 'फ्रेन्ड रिक्वेस्ट' आपल्या आयुष्याचा ताबा घेऊ शकते का ? याची झलक दाखवणारं हे नाटक आहे. 'कुमार सोहोनी यांच्यासारख्या अनुभवी दिग्गज दिग्दर्शकासोबत काम करायला मिळणं हा एक उत्तम अनुभव होता. उत्तम सहकलाकारांमुळे छान टीम तयार झाली असून 'फ्रेन्ड रिक्वेस्ट' हे नाटक रसिकांना सुरेख अनुभव देईल' असा विश्वासही अजय पुरकर व्यक्त करतात.

या नाटकाचा शुभारंभ येत्या २५ जानेवारीला पुण्यातील टिळक स्मारक मंदिर येथे सायंकाळी ५.०० वाजता, तर २६ जानेवारीला बालगंधर्व रंगमंदिर येथे रात्री ९.३० वाजता होणार आहे. १ फेब्रुवारी दुपारी ३.३० वा. श्री शिवाजी मंदिर,दादर येथे नाटकाचा शुभारंभ होईल.

‘फ्रेन्ड रिक्वेस्ट’ नाटकाचे संगीत अशोक पत्की यांचे असून गुरु ठाकूर यांनी गीतलेखनची जबाबदारी सांभाळली आहे. नेपथ्याची बाजू संदेश बेंद्रे यांची असून सूत्रधार दिगंबर प्रभू आणि व्यवस्थापक प्रशांत माणगांवकर आहेत.

'संगीत नाटक अकादमी' हा राष्ट्रपती पुरस्कार मिळवणार्‍या कुमार सोहोनी यांनी आजवर अनेक दर्जेदार नाटकांची मेजवानी रसिकांना दिली आहे. ‘फ्रेन्ड रिक्वेस्ट’ हे नाटकही रसिकांना एक वेगळीच अनुभूती देईल हे नक्की.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : कोल्हापुरात रात्री झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांची दोन्ही समाजांसोबत बैठक

Chhagan Bhujbal : लिंगायत समाजातील पोटजातींचा लवकरच ओबीसींमध्ये समावेश; मंत्री छगन भुजबळ यांचे प्रतिपादन!

"म्हणून मी वडिलांचं टॅक्सी चालवणं बंद केलं.." ती आठवण सांगताना ढसाढसा रडले भरत जाधव; जुना VIDEO चर्चेत

Rohit Sharma नवी लँबॉर्गिनी घेऊन निघाला, मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकला; फॅनने पाहताच पाहा कशी दिली रिअ‍ॅक्शन

SCROLL FOR NEXT