actor ajinkya raut viral kissing scene in takatak 2 movie behind the kissing scene sakal
मनोरंजन

'टकाटक २'मध्ये अभिनेता अजिंक्य राऊतचं लिपलॉक, म्हणाला किस करताना..

'टकाटक २' या बहुचर्चित आणि बोल्ड चित्रपटातील किसिंग सिन सध्या व्हायरल होतोय..

नीलेश अडसूळ

takatak 2 : मराठी चित्रपट विश्वात विशेष म्हणजे तरुणाईमध्ये चर्चा आहे ती 'टकाटक २'ची. अत्यंत खुमासदार शैलीत भाष्य करणारा पण बोल्ड असा हा चित्रपट येत्या १८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रीलीज झाला असून त्यातील एका बोल्ड सिनची चर्चा आहे. या चित्रपटात प्रथमेश परब सोबतच अभिनेता अजिंक्य राऊत देखील प्रमुख भूमिकेत आहे आणि सध्या त्याच्या किसिंग सिनने सर्वांचे लक्ष वेधले आहे. आजवर सोज्वळ भुमिकांमधून समोर आलेला अजिंक्य थेट किसिंग सिन मध्ये दिसल्याने चर्चांना उधाण आले आहे. पण याविषयी आता अजिंक्यने प्रतिक्रिया दिली आहे. (actor ajinkya raut viral kissing scene in taktak 2 movie behind the scene)

या चित्रपटाच्या कीसिंग सीन विषयी अभिनेता अजिंक्य राऊत म्हणतो, 'इंद्राच्या भूमिकेने माझी एक वेगळी इमेज तयार झाली. दिपूची काळजी घेणारा, प्रेमात वेडा पण तितकाच शहाणा आणि सच्च्या मनाचा इंद्रा होता. पण हे पात्र पूर्णतः वेगळे आहे. सिनेमात माझं पात्र शऱ्या असं आहे. याआधी मी कधीच असं बोल्ड पात्र साकारलं नाहीये. मला शिव्या द्यायची सवय नाहीये त्यामुळे हे पात्र साकारताना मी शक्य तितका निरागस भाव ठेवायचा प्रयत्न केला आहे. माझ्या पात्राचं शूट सुरु झाल्यावर अगदी सुरुवातीच्या काळात हा किसिंगचा सीन शूट करण्यात आला होता. पण मी ठरवलं होतं क, आता यामध्ये उडी घेतलीये तर काम चोख करायचं. आपल्या स्वभावापेक्षा वेगळं काहीतरी करावं लागलं तरी करायचं. त्यामुळे मी माझं शंभर टक्के देऊन हे धाडस करायचा प्रयत्न केला आहे. तो सीन झाल्यावर अक्षरशः एखादा टप्पा पार केल्यासारखं वाटत होतं.' (actor ajinkya raut bold scene in takatak 2 movie)

पुढे तो म्हणतो, 'मी हा सिनेमा लॉकडाउनच्या काळात केला जेव्हा मी परभणीहून मुंबईला एका प्रोजेक्टसाठी आलेलो आणि तो प्रोजेक्ट मी करत नाहीये असं मला समजलं. 'मन उडू उडू झालं' ही मालिका त्या नंतर मला मिळाली. पण त्या आधी मिळालेला हा सिनेमा मी एक वेगळा प्रयोग म्हणून स्वीकारला. स्वतःच्या कम्फर्ट झोन पलीकडे जाऊन काहीतरी करावं म्हणून हा सिनेमा केला. सध्या प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. पण या निमित्ताने मलाही काहीतरी वेगळं करून पाहता आलं' अशा भावना अजिंक्यने व्यक्त केल्या.

मिलिंद कवडे दिग्दर्शित 'टकाटक 2' या चित्रपटात अभिनेता प्रथमेश परब, अक्षय केळकर, अजिंक्य राऊत, भूमिका कदम, प्रणाली भालेराव, कोमल बोडखे, सुशांत दिवेकर, स्वप्नील राजेशिर्के, किरण माने, पंकज विष्णू, किरण बेरड, आरजे महेश काळे, स्मिता डोंगरे असे तरुण पण इरसाल कलाकार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Croatia vs Portugal : ख्रिस्तियानो रोनाल्डो स्वप्नपूर्तीच्या दिशेने एक पाऊल पुढे जाणार की स्वप्नांचा चुराडा होणार? दोन दिग्गजांची कसोटी

Shadu Idols : शाडूच्या मूर्तीबाबत अडचण काय? POP वर सरसकट बंदी नको, राज्य सरकारचा विरोध; शाडूच्या मूर्तीला अडचण काय? हायकोर्टाची विचारणा

Navi Mumbai News : नवी मुंबईत गर्भवतीचा उपचारादरम्यान मृत्यू, दुसरी गंभीर; चौकशी समिती नियुक्त

Empire State Tower Proposal : प्रियसीला घेऊन १,४५४ फूट उंच टॉवरवर चढला; किस करत केलं प्रपोज, उतरवण्यासाठी पोलिसांनी हेलिकॉप्टर, रस्ते केले बंद, सोशल मीडियावर व्हायरल

Mumbai News : आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली; प्रमोशन नाकारणाऱ्या 'लाडक्या' अभियंत्यांवर मेहेरनजर?

SCROLL FOR NEXT