actress Aishwarya rai  Team esakal
मनोरंजन

'तिच्यावरुन नजर काही केल्या हटतच नाही '

तिच्या एखाद्या सहका-यानं काही सांगितलं तर ते दखल घ्यावं असं असतं.

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमध्ये एकापेक्षा एक सुंदर अभिनेत्री आहेत. त्यांची ब्युटी नेहमीच चर्चेचा विषय असतो. सध्या अशाच एका विश्वसुंदरीच्या नावाची चर्चा सुरु आहे. तिचं नाव आहे ऐश्वर्या. जगभरात ऐश्वर्याच्या नावाचे किस्से फेमस आहेत. ती आहेही सुंदर हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. मात्र तिच्या एखाद्या सहका-यानं काही सांगितलं तर ते दखल घ्यावं असं असतं. प्रसिध्द अभिनेता अक्षय खन्ना (Akshay Khanna) यानं काही ऐश्वर्यावर (Aishwarya Rai ) प्रतिक्रिया दिली आहे. ती सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. (When Akshay Khanna Said His Eyes Off Aishwarya Rai Called Her Sexiest)

बॉलीवू़डमधील अनेक सेलिब्रेटी ऐश्वर्याचे (Aishwarya Rai ) फॅन्स राहिले आहेत. तिच्या सौंदर्याचे सर्वजण चाहते आहेत. लाखो फॅन्स असणा-या ऐश्वर्याचं कौतूक सेलिब्रेटीही करत असतात. ऐश्वर्यालाही पसंत करणारा एक अभिनेता आहे. त्यानं ऐश्वर्याला जी कमेंट दिली होती. त्यावरुन आता तो चर्चेत आली आहे. त्या अभिनेत्याचे नाव आहे अक्षय खन्ना. तो भलताच व्हायरल झाला आहे. त्याच्या ऐश्वर्यावरच्या कमेंटमुळे. असं काय म्हणाला अक्षय की ज्यामुळे तो चर्चेत आला. ते कारण जाणून घेऊया.

एका मुलाखतीमध्ये अक्षयनं ऐश्वर्याविषयी सांगितले. त्यामुळे तो तिचा किती मोठा फॅन आहे हे समजले आहे. त्यानं ऐश्वर्या सोबत दोन चित्रपटांमध्ये काम केले होते. ताल आणि आ अब लौट चले हे त्या चित्रपटांची नावे आहेत. दिग्दर्शक आणि प्रेक्षकांनी देखील त्या दोघांच्या जोडीला पसंत केले होते. 2017 मध्ये अक्षय हा त्याच्या इत्तेफाक नावाच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी करण जोहरच्या शो मध्ये गेला होता. त्यावेळी त्यानं आपल्या मनातील भावना व्यक्त केली होती.

करणनं त्याला विचारले होते की, बॉलीवूडमध्ये सर्वात सुंदर अभिनेत्री कोणती, त्यावेळी अक्षयनं ऐश्वर्याचे नाव सांगितले होते. मी जेव्हा ऐश्वर्याला भेटतो तेव्हा तिच्यावरुन माझी नजर काही हटत नाही. ब-याचदा हा प्रकार ओशाळवाणा असतो हे मान्य आहे. या शो मध्ये अक्षयच्या जोडीला सोनाक्षीही होती. तिनंही सांगितलं की, मी पण ज्यावेळी ऐश्वर्याकडे पाहते तेव्हा तिच्यावरुन नजर हटत नाही. ती खूपच सुंदर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT