actor akshay kumar emotional post after read shikhar dhawan post for his son  SAKAL
मनोरंजन

Akshay Kumar: "...यापेक्षा वेदनादायक काहीही असू शकत नाही", अक्षय कुमारची भावनिक पोस्ट! असं काय घडलं?

अक्षय कुमारने सोशल मीडियावर लिहीलेल्या भावूक पोस्टची चर्चा आहे

Devendra Jadhav

Akshay Kumar Emotional Post News: भारतीय मनोरंजन विश्वातील खिलाडी अक्षय कुमार सध्या सोशल मीडियावर चांगला चर्चेत आहे. अक्षयने नुकत्याच झालेल्या उमंग फिल्म फेस्टिव्हलमध्ये टायगर श्रॉफसोबत धमाकेदार एन्ट्री घेतली.

पण सध्या अक्षय कुमारने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट केलीय. यामुळे अक्षयला नक्की झालंय काय? असा प्रश्न सर्वांना पडला असेल. आम्ही तुम्हाला सांगतो.

काय म्हणाला अक्षय?

शिखर धवनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. यात त्याने त्याच्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अत्यंत भावनिक पोस्ट लिहीली. शिखरची पोस्ट वाचून अक्षय सुद्धा इमोशनल झालेला दिसला.

अक्षय कुमारने लिहिले की, "ही पोस्ट पाहून मी खूप भावूक झालो आहे. मी पण बाप आहे. मला माहित आहे की आपल्या मुलाला भेटू न शकणे, त्याच्याशी बोलू न शकणे यापेक्षा वेदनादायक काहीही असू शकत नाही. शिखर हिंमत ठेव! लाखो लोक तुझ्यासाठी प्रार्थना करत आहेत की, तुला तुझ्या मुलाला लवकर भेटता यावं."

न्यायालयाने शिखरला भेटण्याची परवानगी नाही दिली

याच वर्षी ऑक्टोबरमध्ये दिल्ली कोर्टाने शिखर धवन आणि त्याची पत्नी आयशा यांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली होती. हा निकाल देताना न्यायालयाने शिखरच्या मुलाचा ताबा त्याला दिला नाही. मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतरही आयशा शिखर आणि त्याचा मुलगा जोरावरला एकमेकांपासून दूर ठेवत आहे. काल, शिखरने आपल्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. गेल्या एक वर्षापासून तो मुलापासून दूर असल्याचे त्याने सांगितले.

शिखर धवनची मुलासाठी पोस्ट

शिखरने मुलाच्या वाढदिवससाठी खास पोस्ट लिहीली होती. यात शिखर लिहीतो, "मी तुम्हाला एका वर्षापासून भेटलो नाही. तीन महिन्यांहून अधिक काळ झाला आहे... मला सर्वत्र ब्लॉक करण्यात आले आहे. त्यामुळे मी तुमचा जुना फोटो पोस्ट करत आहे जेणेकरून मी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकेन. माझ्या मुला, वाढदिवसाच्या शुभेच्छा.

मी तुला भेटू शकत नाही पण, या जगात टेलिपॅथी नावाची एक गोष्ट आहे. मी तुझ्याशी मनाने जोडला गेलोय. मला तुझा अभिमान आहे. मला माहित आहे की तू चांगले काम करत आहेस. आणि तू चांगला मोठा होत आहेस. बाबाला तुझी खूप आठवण येत आहेत. तुझ्यावर खूप प्रेम करतात. आयुष्यात कोणालाही दुखवू नका. लोकांना मदत करा, दयाळू व्हा, धीर धरायला शिका आणि खंबीर राहा. तुला पाहू शकत नाही तुझ्याशी कसं बोलावं ते कळत नाही, पण मी तुला रोज निरोप नक्की पाठवतो. खूप प्रेम. - पप्पा."

शिखरची ही पोस्ट वाचून अनेकांनी त्याचं सांत्वन करुन त्याला धीर दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, राज ठाकरेंकडून भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांवर टीका

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT