actor Akshay Kumar gets trolled for his treadmill run social cause director Neeraj ghaywan said Treadmill Its a roller coaster jolly ride  
मनोरंजन

ट्रेड मिल वर 21 किमी चालणं यात कसलं कौतूक; अक्षय झाला ट्रोल

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - अक्षय जसा त्याच्या अभिनयासाठी प्रसिध्द आहे तसा तो त्याच्या सामाजिक उपक्रमासाठीही ओळखला जातो. त्याने वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर चित्रपटही बनवले आहे. तृतीयपंथीयांच्या आयुष्यावर आधारित लक्ष्मी नावाचा चित्रपट नुकताच येऊन गेला. त्याला बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात यश मिळाले. यापूर्वीही अक्षयनं महिलांच्या मासिक पाळी विषयावर पॅडमॅन, शौचालयाच्या प्रश्नावर टॉयलेट एक प्रेमकथा नावाचा चित्रपट केला होता. त्यालाही मोठ्या प्रमाणात चाहत्यांचा प्रतिसाद मिळाला होता.

आता अक्षय एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे. त्यानं एक पोस्ट गेल्या काही दिवसांपूर्वी शेयर केली होती. मात्र त्यावरुन ट्रोल झाला होता. अक्षयला त्यानं घेतलेल्या सामाजिक भूमिकेचा त्याला मोठा फटका बसला आहे. त्याचे झाले असे की, अक्षयनं देशात होत असलेल्या पाण्याच्या समस्ये संदर्भातील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. येथे त्याने पाणी भरण्यासाठी दररोज 21 किमी चालत जाणाऱ्या महिलांच्या वेदनेचा विषय मांडला. एवढंच नाही तर अक्षयने त्या महिलांबद्दल सहानुभूती दर्शविण्यासाठी तो ट्रेडमिलवर 21 किमी चालला. पण यावेळी चाहत्यांना त्याचा हा अंदाज फारसा आवडला नाही आणि त्यांनी अक्षयला ट्रोल करायला सुरुवात केली.

दिग्दर्शक नीरज घेवान यांनी अक्षयच्या ट्रेडमिलवर धावण्याच्या टविटवर आपली प्रतिक्रिया दिली. नीरज यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये कुठेही अक्षयचं नाव घेतलं नाही. पण तरीही त्यांचा रोख अक्षयकडे होता. ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले की, 'एखाद्या शेतात जाऊन काम करा, मग घरी येऊन स्वयंपाक करून घरातली सर्व कामं करा आणि पुन्हा या सर्व गोष्टी करत राहा. ट्रेडमिल हे एखाद्या रोलर कोस्टर राइडसारखं आहे. त्याची तुलना करता येऊ शकत नाही.' या शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. याबरोबरच अक्षयच्या या पोस्टवर काही युझर्सने शेतकरी आंदोलनासंदर्भात त्याच काय मत आहे हे जाणून घ्यावेसे वाटले, 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT