actor akshay kumar metro ride to avoid mumbai traffic bade miyan chhote miyan SAKAL
मनोरंजन

Akshay Kumar: अक्षयने केली मेट्रो सफर! कोणीच नाही ओळखलं, व्हिडीओ व्हायरल

अक्षय कुमारने मेट्रो सफर केली आहे. व्हिडीओ व्हायरल झालाय

Devendra Jadhav

Akshay Kumar News: अनेकदा कलाकार मुंबईच्या ट्रॅफिकमधून वाचण्यासाठी मुंबई मेट्रोचा आधार घेतात. गुरुवारी सुद्धा अशीच एक घटना घडली. आणि यावेळी कलाकार होता अक्षय कुमार.

अभिनेता अक्षय कुमारने ट्रॅफिकवर मात करण्यासाठी मेट्रोमध्ये प्रवास करण्याचा निर्णय घेतला. अक्षयचे अनेक व्हिडिओ आणि फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अक्षय तोंडावर मास्क लावताना दिसतोय. यावेळी अक्षयने काळ्या रंगाची टोपी आणि हुडी परिधान केली होती.

याशिवाय अक्षयने पांढऱ्या रंगाचे स्नीकर्स घातले आहेत. अक्षयसोबत निर्माता दिनेश विजन दिसत असून तो त्यांच्याशी बोलताना दिसला.

अक्षय शांतपणे दरवाज्याजवळ असलेल्या सीटजवळ बसलेला दिसला. यावेळी अक्षय सहप्रवाशांना कोणताही त्रास न देता निर्माता दिनेश विजनशी गप्पा मारताना दिसला

व्हिडीओ व्हायरल होताच इंटरनेटवर अक्षयचं खुप कौतुक होतंय. अक्षयने स्वतःला कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरीही एका चाहत्याने हा व्हिडीओ व्हायरल केलाय.

एका युजरने लिहिले, "अत्यंत नम्र आणि डाउन-टू-अर्थ अक्षय पाजी कामासाठी प्रवास करण्यासाठी मुंबई मेट्रोचा वापर करत आहेत!"

दुसर्‍या युजरने कमेंट केली की, "सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता, आशियातील सर्वात मोठा अॅक्शन हिरो, परंतु तरीही पद्मश्री अक्षय कुमारने मुंबई मेट्रोने प्रवास करणे निवडले. त्याचा साधेपणा बॉलीवूडच्या चकचकीत जगात ताजेतवाने करणारा आहे."

अक्षय कुमार लवकरच टायगर श्रॉफसोबत बडे मिया, छोटे मिया सिनेमात झळकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दिलासादायक बातमी! ओसी मिळवण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद होणार; नवे निकष लागू करणार, पण कोणते?

Pune Traffic Update: पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी वाहतुकीत बदल; मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते कसे आहेत बदल?

MI vs RCB: पांड्या ब्रदर्समध्ये वाद? कृणालने आधी हार्दिकला बाऊन्सर मारला अन् आऊट होताच असं काही केलं की...

विजय वर्मासोबत मटका किंगमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री; व्यक्तिरेखेबद्दल म्हणाली..

Hydrogen Cooking Stove India : गॅस किंवा रॉकेलची गरज नाही, चक्क पाण्यावर चालतो 'हा' स्टोव्ह, मात्र किंमत ऐकून बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT