actress alka kubal said about maherchi sadi in bus bai bus show on zee marathi  sakal
मनोरंजन

अलका कुबल यांच्याकडे साड्या किती, त्यातल्या माहेरच्या किती.. ठाऊक आहे का?

अभिनेत्री अलका कुबल यांच्या आयुष्यातील 'या' गोष्टी ऐकून तुम्ही व्हाल थक्क

नीलेश अडसूळ

अभिनेत्री अलका कुबल. मराठी मनोरंजन विश्वातील एक मोठं नाव. कित्येक चित्रपट, कित्येक मालिका अजरामर केलेली ही अभिनेत्री मनोरंजन क्षेत्रात आजही तितकीच सक्रिय आहे. मग ती 'आई माझी काळूबाई' मालिका असो किंवा 'धुरळा' सारखा दर्जेदार चित्रपट. अलका ताईंनी त्यांच्या अभिनयाची जादू कायमच दाखवली आहे. अलका कुबल म्हणजे रडणारे आणि रडवणारे सिनेमे अशी कितीही टीका त्यांच्यावर झाली तर चाहताव वर्ग कमी झालेला नाही. त्यांच्या अजरामर चित्रपटांपैकी एक म्हणजे 'माहेरचा साडी'. महाराष्ट्राच्या या आदर्श सूनेकडे नेमक्या साड्या किती आणि त्यातल्या माहेरच्या किती हे माहितीय तुम्हाला.. आज जाणून घेऊया..

(actress alka kubal said about maherchi sadi in bus bai bus show on zee marathi)

महाराष्ट्रात चित्रपटांच्या इतिहासातील एक महत्वाचा चित्रपट म्हणजे 'माहेरची साडी'. अलका कुबेर कुबल यांचा हा चित्रपट जवळजवळ २५ आठवडे तुफान चित्रपटगृहात चालत होता, असे म्हणतात. या चित्रपटाने घराघरातील महिलांना अक्षरशः रडवले. हा चित्रपट इतका गाजला की 'माहेरची साडी' माहित नाही असा कुणीही नाही. या चित्रपटापासून अलका ताईंची आदर्श सून म्हणून झालेली ओळख आजही तशीच आहे. पण अलका ताईंकडे खऱ्या आयुष्यात माहेरच्या साड्या किती हे माहित आहे का? (alka kubal saree collection)

पण या प्रश्नाचं उत्तर लवकरच तुम्हाला मिळणार आहे. कारण झी मराठीवर 'बस बाई बस' ही नवी मालिका सुरू होत आहे. या मालिकेत महिला कलाकार सहभागी होणार असून या महिला कलाकारांना इतर महिलांच्या मनातले प्रश्न विचारले जाणार आहेत. या कार्यक्रमात अभिनेत्री अलका कुबल सहभागी होणार असून त्यांच्या आयुष्यातील अनेक माहीत नसलेल्या गोष्टी या निमित्ताने उघड होणार आहे. येत्या 29 जुलै पासून ही गप्पांची भन्नाट मैफल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amazon child shopping: आता बोला...! आई-वडील झोपेतच अन् तिकडं त्यांच्या लाडक्या चिमुकल्यानं चक्क 'अमेझॉन'वर केली अडीच लाखांची खरेदी

Mahadev Munde Case: खळबळजनक! '‘महादेव मुंडे खून प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला वाल्मीकने संपवलं’', आकस्मिक मृत्यूचा बनाव

MLA Ramesh Thorat : माजी आमदार रमेश थोरात घड्याळ हाती बांधण्याच्या तयारीत; अशोक पवार मात्र पक्षातच समाधानी

Latest Marathi News Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

MLA Rahul Kul : उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये बुडीत बंधारे उभारावेत; आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

SCROLL FOR NEXT